Ben Stokes on Jeson Roy: इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड वन डे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात अष्टपैलू बेन स्टोक्सने शानदार खेळी खेळली आणि शतक झळकावले. स्टोक्सने १८२ धावांची विक्रमी खेळी खेळली. त्यामुळे इंग्लंडने न्यूझीलंडकडून दारुण पराभव केला. यादरम्यान बेन स्टोक्सने पार्टनर जेसन रॉयची माफी मागितली. न्यूझीलंडविरुद्धच्या सुरु असलेल्या वन डे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात बेन स्टोक्सने १२४ चेंडूत १५ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने १८४ धावा केल्या. बेन स्टोक्सने मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध जेसन रॉयची १८० धावांची धावसंख्या मागे टाकली. त्यानंतर त्याने इंग्लंडसाठी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या केल्याबद्दल रॉयची माफी मागितली मात्र, ही माफी विनोदी स्वरुपाची होती. त्याने त्याची मस्करी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स याने अलीकडेच एकदिवसीय क्रिकेटमधील निवृत्तीतून माघार घेतली आहे. स्टोक्सच्या या निर्णयाने इंग्लंडच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत जबरदस्त खेळी केली. या शानदार खेळीनंतर त्याने निवृत्तीतून माघार घेण्याविषयीचे गुपित उलगडले आहे. त्याने याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. स्टोक्सच्या म्हणण्यानुसार, “मला  आधीपासूनच माहिती होते की, मी यावर्षी भारतात होणाऱ्या विश्वचषकात खेळणार आहे.”

हेही वाचा: Asia Cup 2023: माजी खेळाडू कामरान अकमल पाकिस्तानच्या कामगिरीवर भडकला; म्हणाला, “भारताचं सोडा नेदरलँड्सकडून पराभूत होईल…”

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू काय म्हणाला?

डावखुरा फलंदाज बेन स्टोक्स याने शारीरिक आणि मानसिक ताणामुळे मागील वर्षी वन डे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. यावेळी तो म्हणाला होता, “मी वन डे क्रिकेटमध्ये माझे १०० टक्के योगदान देत नव्हतो. त्यामुळे मी या क्रिकेटप्रकारातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.” मात्र, स्टोक्स आता पुन्हा एकदा वनडेत परतला आहे. त्याने जबरदस्त प्रदर्शनही करताना दिसत आहे.

स्टोक्सने न्यूझीलंडविरुद्ध १८२ धावांची अफलातून खेळी साकारून संघाला १८१ धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला. या खेळीनंतर तो म्हणाला, “मला आधीपासूनच माहिती होते की, मी या सामन्यांमध्ये आणि आगामी विश्वचषकातही खेळणार आहे. मात्र, माध्यमांचे लक्ष विचलित करण्यासाठी मी त्यावेळी काही सांगितले नव्हते.” त्याच वेळी त्याने जेसन रॉयचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडल्याने त्याची माफी देखील मागितली.

या सामन्यात अव्वल फळीतील फलंदाज डेव्हिड मलाननेही ९६ धावांची उत्कृष्ट खेळी खेळली, तरीही त्याला आपले शतक पूर्ण करता आले नाही. बेन स्टोक्सने मलानचे कौतुक केले आणि म्हणाला, “त्याच्या फलंदाजीत सातत्याता आहे. जरी तो सेट होऊन मोठी खेळी करू शकत नसला तरी तो स्ट्राईक रेट चांगला राखतो. पायाला दुखापत झाल्याने त्याचे शतक हुकले.”

हेही वाचा: SL vs PAK: ICC नंबर १ फलंदाज बाबर आझम २० वर्षाच्या खेळाडूसमोर हतबल, वेल्लालागेने दाखवला घरचा रस्ता; पाहा Video

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडला ३६८ धावांचे मोठे लक्ष्य दिले होते. याला प्रत्युत्तर देताना न्यूझीलंडला केवळ १८७ धावा करता आल्या. मात्र, या सामन्यात न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टही लयीत दिसला. त्याने इंग्लंडकडून पाच विकेट्स घेतल्या. या ४ सामन्यांच्या वन डे मालिकेत इंग्लंडने २-१ अशी आघाडी घेतली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why did ben stokes apologize to jason roy after his stormy innings of 182 runs know the reason avw