ICC World Cup 2023: हार्दिक पांड्या दुखापतीमुळे २०२३च्या विश्वचषकातून बाहेर पडला असून त्याच्या जागी बीसीसीआयने प्रसिध कृष्णाचा समावेश केला आहे. जेव्हा पांड्या अधिकृतपणे बाहेर नव्हता तेव्हा असे मानले जात होते की अक्षर पटेलला स्थान मिळू शकते कारण, तो गोलंदाजीबरोबर चांगली फलंदाजी देखील करू शकतो. विश्वचषक २०२३च्या पहिल्या संघात अक्षर पटेलचा समावेश होता पण दुखापतीमुळे त्यालाही बाहेर व्हावे लागले होते, आता तो बरा असून देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याचे शानदार पुनरागमन झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रसिध कृष्णा हा संघासाठी योग्य वेगवान गोलंदाज आहे, असे बीसीसीआयचे मत आहे. सध्या संघात समाविष्ट असलेले तीनही वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज चांगली गोलंदाजी करत आहेत. भारत ४ वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरणार नाही, त्यामुळे हार्दिकच्या जागी अष्टपैलू खेळाडूचा समावेश नसावा का, अक्षर पटेल हा योग्य पर्याय नव्हता का? पण प्रसिध कृष्णाला का स्थान? असे अनेक प्रश्न सध्या चाहते आणि माजी क्रिकेटपटू बीसीसीआयला विचारत आहेत.

हार्दिक पांड्याच्या जागी प्रसिध कृष्णा योग्य पर्याय आहे का?

हार्दिक पांड्या फलंदाजीबरोबर गोलंदाजीतही महत्त्वाची भूमिका बजावतो. मोहम्मद शमीला त्याच्यामुळे पहिल्या चार सामन्यात बाहेर बसवले होते. सिराज आणि बुमराहसह पांड्या तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून खेळत होता. पांड्याला दुखापत झाल्यावर शमीचा प्लेइंग-११ मध्ये समावेश करण्यात आला. भारत तीन वेगवान गोलंदाजांच्या पर्यायाने खेळत आहे आणि सध्या तीनही गोलंदाज चमकदार कामगिरी करत आहेत.

मोहम्मद शमीने दोनदा पाच विकेट्स घेतल्या आहेत, सिराज आणि बुमराह सुरुवातीला विकेट्स घेण्यात यशस्वी ठरले आहेत. या त्रिकुटाने श्रीलंकेला ५५ धावांत सर्वबाद केले. प्रसिध कृष्णाचा संघात समावेश झाला आहे पण त्याला प्लेइंग-११ मध्ये स्थान मिळणे सध्या अवघड आहे. तो बाहेर बसेल पण बदली म्हणून तो योग्य निवड का होता? चला समजून घेऊया.

सोशल मीडियावर अनेक यूजर्स म्हणत आहेत की, “हार्दिक पांड्याच्या जागी फलंदाजीबरोबर गोलंदाजी करू शकणार्‍या खेळाडूचा समावेश करायला हवा होता.” काही यूजर्स असेही म्हणतात की, “अक्षर पटेल हा चांगला पर्याय होता कारण तो चांगली फलंदाजी करतो पण प्रसिध कृष्ण हा परिपूर्ण वेगवान गोलंदाज आहे आणि तो एक चांगला पर्याय आहे.”

हेही वाचा: World Cup 2023: इंग्लंडच्या विश्वचषकातील कामगिरीवर रवी शास्त्री संतापले; म्हणाले, “तुम्ही स्वतःला काय गतविजेते…”

भारतीय संघात समाविष्ट असलेले तीनही वेगवान गोलंदाज चांगली कामगिरी करत आहेत, प्रसिध कृष्णाचा रेकॉर्डही चांगला आहे. भारताला आपल्या वेगवान गोलंदाजांचे त्रिकूटाची लय तोडायचे नाही, परंतु येथे कोणताही गोलंदाज दुखापत झाल्यास कृष्णा हा एक चांगला पर्याय असेल, दुसरीकडे भारत सध्या फलंदाजीत खूप मजबूत आहे.

फिरकी गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि आर. अश्विन यांचा संघात समावेश आहे. अश्विनला सध्या प्लेइंग-११ मध्ये स्थान मिळत नाहीये, म्हणजेच फिरकी गोलंदाजीतील एक पर्याय बाहेर बसला आहे. येथे कोणताही वेगवान गोलंदाज जखमी झाल्यास भारताकडे वेगवान गोलंदाजीचा पर्याय असायला हवा, त्यामुळे त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. प्रसिध कृष्णाने १७ एकदिवसीय सामन्यांमध्ये २९ विकेट्स घेतल्या आहेत, त्याची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे १२ धावांत ४ विकेट्स अशी असून त्याचा इकोनॉमी रेट हा ५.६० आहे.

हेही वाचा: World Cup 2023: “पीसीबीला आम्ही विश्वचषक जिंकावा असे…”,पाकिस्तानच्या वरिष्ठ खेळाडूने केला मोठा खुलासा

विश्वचषक २०२३ भारतीय संघ: विश्वचषकासाठी टीम इंडियाचा संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव, प्रसिध कृष्णा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why did prasidh krishna not akshar patel become the first choice for hardik pandyas replacement know avw