Why Rahul Dravid did not re apply for Team India coaching post : भारतीय संघाने टी-२० विश्वचषक २०२४ च्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी मात करत दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर नाव कोरलं. त्याचबरोबर ११ वर्षांनी आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. यानंतर आता राहुल द्रविड यांचा टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपला आहे. द्रविड यांनी २०२१ च्या अखेरीस टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली आणि टी-२० विश्वचषक २०२४ पर्यंत तो संघात राहिला. द्रविड यांची इच्छा असती तर तो प्रशिक्षकपदासाठी पुन्हा अर्ज करू शकला असता, पण त्याने तसे केले नाही. या दिग्गज फलंदाजाने असे का केले? आता याचे कारण समोर आले आहे.

बीसीसीआयच्या घटनेनुसार, प्रशिक्षक बनू इच्छिणाऱ्या कोणालाही अर्ज करावा लागतो, जरी तो विद्यमान प्रशिक्षक असला तरीही. मात्र द्रविड यांनी पुन्हा अर्ज न करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. द्रविडने हा निर्णय का घेतला हे उघड झाले आहे. द्रविडने पुन्हा अर्ज का केला नाही, याचे स्पष्टीकरण बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिले आहे.

how many press conference taken by dr manmohan singh
Dr. Manmohan Singh Death: डॉ. मनमोहन सिंग यांनी १० वर्षांत किती पत्रकार परिषदा घेतल्या? पंतप्रधान मोदींशी याची तुलना का केली जाते?
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
rahul gandhi devendra fadnavis
Devendra Fadnavis: “…हेच राहुल गांधींचं एकमेव ध्येय”, देवेंद्र फडणवीसांची बीड-परभणी दौऱ्यावरून थेट टीका!
Image of Uttam Jankar
Ajit Pawar : “…तर मी अजित दादांबरोबर जाईन”, शरद पवार यांच्या आमदाराचे मोठे विधान
chhagan bhujbal meets devendra fadnavis
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीसांना भेटून आल्यावर भुजबळ म्हणतात, “मी त्यांना सगळं सांगितलं आहे, त्यांनी ८-१० दिवस…”
Chhagan Bhujbal Devendra Fadnavis Meet
Amol Mitkari : छगन भुजबळांनी घेतली फडणवीसांची भेट, राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “ही राजकीय भेट…”
Chandrakant Patil On Pune Guardian Minister
Chandrakant Patil : पुण्याचं पालकमंत्रिपद मिळालं तर स्वीकारणार का? चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, “माझं नेतृत्व मला…”
Chhagan Bhujbal And Manikrao Kokate.
Chhagan Bhujbal : “मला वाटते भुजबळांनी पंतप्रधान व्हावे…”, छगन भुजबळांच्या नाराजीवर राष्ट्रवादीच्या नव्या मंत्र्याचे भाष्य

जय शाहांनी राहुल द्रविडबद्दल केला खुलासा –

बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले, “त्यांनी मला सांगितले की कौटुंबिक बांधिलकीमुळे तो पुन्हा अर्ज करू इच्छित नाही. त्यामुळे त्यांना आता प्रशिक्षकपदावरून पायउतार व्हायचे आहे. आम्ही त्यांच्या निर्णयाचा आदर केला. मी त्यांच्यावर जबरदस्तीही केली नाही. राहुल भाई यांनी गेली साडेपाच वर्षे भारतीय क्रिकेटची सेवा केली आहे. ते तीन वर्षे एनसीएचे संचालक होते आणि गेली अडीच वर्षे ते टीम इंडियाचे प्रशिक्षक आहेत.”

हेही वाचा – Team India : बेरिल चक्रीवादळमुळे टीम इंडिया बार्बाडोसमध्ये अडकली, मायदेशी कधी परतणार? जाणून घ्या अपडेट

टीम इंडियाच्या कोचपदासाठी दोन नावं शॉर्टलिस्ट –

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, निवडक माध्यमांशी बोलताना जय शाह ६ जुलैपासून सुरू होणाऱ्या झिम्बाब्वे दौऱ्याचा संदर्भ देत म्हणाले, “प्रशिक्षक आणि निवडकर्ते दोघेही लवकरच नियुक्त केले जातील. सीएसीने मुलाखती घेतल्या आहेत आणि दोन नावे निश्चित केली आहेत. मुंबईत पोहोचल्यानंतर त्यांनी जो काही निर्णय घेतला आहे, आम्ही त्यानुसार जाऊ. व्हीव्हीएस लक्ष्मण झिम्बाब्वेला जाणार आहे, परंतु नवीन प्रशिक्षक श्रीलंका मालिकेत सामील होतील.” भारतीय संघाला २७ जुलैपासून तीन टी-२० आणि तितक्याच एकदिवसीय सामन्यांसाठी श्रीलंका दौऱ्यावर जायचे आहे.

Story img Loader