Dilip Vengsarkar Nickname Colonel : भारतीय संघाने १९८३ साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. त्या विश्वचषक विजयाने भारतीय क्रिकेटला नवी दिशा दिली. या विश्वशचषक विजेत्या संघाचे दिलीप वेंगसकर सदस्य होते. महाराष्ट्रातील राजापूर जन्मलेल्या वेंगसकरांनी १५ वर्षे भारतीय क्रिकेटवर राज्य केले. ते भारतीय संघाचे कर्णधार आणि निवडसमितीचे सदस्यही राहिले आहे. वेंगसकरांना त्यांचे सहकारी वेंगी, लॉर्ड ऑफ लॉर्डस आणि कर्नल नावाने म्हणायचे. त्यामुळे आज आपण त्यांचे सहकारी त्यांनाा कर्नल का म्हणायचे? जाणून घेऊया.
दिलीप वेंगसरकरांना कर्नल का म्हणतात?
भारताचे माजी खेळाडू दिलीप वेंगसरकर यांनी या ‘कर्नल’ नावाबद्दल स्वत:च एका मुलाखतीत खुलासा केला. १९७५ मध्ये इराणी ट्रॉफीमध्ये त्यांनी बॉम्बेसाठी रेस्ट ऑफ इंडियाविरुद्ध वादळी शतक झळकावले होते. या डावात वेंगी यांनी बिशनसिंग बेदी आणि इरापल्ली प्रसन्ना यांच्यासारख्या दिग्गज गोलंदाजांची धुलाई केली होती. त्यावेळी या सामन्यात कॉमेंट्री करणारे लाला अमरनाथ यांनी ही खेळी पाहून कर्नल सीके नायडू यांच्याशी त्यांची तुलना केली होती, असे वेंगी यांनी सांगितले. तेव्हापासून वेंगी यांचे कर्नल असे नाव पडले.
‘लॉर्ड ऑफ लॉर्डस’ –
लंडनमधील लॉर्ड्स स्टेडियमवर तीन शतके झळकावसाठीही दिलीप वेंगसरकरची ओळखले जाते. लॉर्ड्सला क्रिकेटचे ‘मक्का’ म्हटले जाते. येथे खेळणे ही कोणत्याही क्रिकेटपटूचे स्वप्न असते. दिलीप वेंगसरकर यांनी येथे चार कसोटी सामने खेळले आहेत. पहिल्या तीन कसोटीत त्यांनी शतकी खेळी साकारली. त्यांनी चौथ्या कसोटीत ५२ आणि ३५ धावा केल्या होत्या. अशा प्रकारे त्यांनी या मैदानावर ४ कसोटीत ५०० हून अधिक धावा केल्या आहेत. डॉन ब्रॅडमन, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांसारख्या दिग्गजांचीही लॉर्ड्सवर ३ शतके नाहीत. त्यामुळे त्यांना ‘लॉर्ड ऑफ लॉर्डस’ असे म्हणतात
हेही वाचा – Ayush Badoni : खेळाडू आहे की सुपरमॅन! आयुष बदोनीने घेतलेला चित्तथरारक झेल पाहून सर्वच अवाक्, पाहा VIDEO
भारतीय क्रिकेट हा त्या भाग्यवान संघांपैकी एक आहे, ज्यांच्या प्रत्येक काळातील संघात एक ‘भिंत’ राहिली आहे. १९५६ मध्ये जन्मलेले वेंगसरकर हे देखील अशा खेळाडूंपैकी एक आहेत ज्यांच्यावर त्यांचा संघ आणि चाहत्यांचा पूर्ण विश्वास होता. विशेषत: भारतीय संघ संकटात असताना हा खेळाडू आपला सर्वोत्तम खेळ दाखवत असे. वेंगसरकरच्या निवृत्तीनंतर राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, चेतेश्वर पुजारा हे खेळाडू ही भूमिका पार पडताना दिसले आहेत.
हेही वाचा – IND vs NZ : पुण्याच्या खेळपट्टीवर वेगवान की फिरकी गोलंदाज, कोणाचे वर्चस्व पाहायला मिळणार?
विराट कोहलीची भारतीय संघात निवड –
दिलीप वेंगसरकर यांनी सर्वप्रथम विराट कोहलीची भारतीय संघात निवड केली होती. वेंगसरकर २००६ मध्ये टीम इंडियाच्या निवडसमितीचे अध्यक्ष बनले आणि २००८ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने अंडर-१९ विश्वचषक जिंकला. यानंतर वेंगसरकर यांनी विराट कोहलीला श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियात स्थान देण्याचा निर्णय घेतला. मात्र, तत्कालीन कर्णधार एमएस धोनी आणि प्रशिक्षक गॅरी कर्स्टन सहमत नव्हते. धोनी आणि कर्स्टन यांना जुन्या टीमसोबत श्रीलंका दौऱ्यावर जायचे होते. पण वेंगसरकर यांनी कोहलीची प्रतिभा पाहून त्याला संधी दिली. आज कोहलीची प्रतिभा सर्वांसमोर आहे.