Sunil Gavaskar on Rohit Sharma: टीम इंडियाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी आशिया कप आणि वर्ल्ड कप २०२३आधी कर्णधार रोहित शर्माच्या कॅप्टन्सीबद्दल एक टिप्पणी केली आहे. या दोन्ही घटना रोहितसाठी खूप महत्त्वाच्या असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. वास्तविक, रोहितच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला आशिया कप आणि आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ या दोन मोठ्या स्पर्धा खेळायच्या आहेत. आशिया चषक ३० ऑगस्टपासून सुरू होत आहे. त्यानंतर विश्वचषक २०२३ ही स्पर्धा ५ ऑक्टोबरपासून खेळवली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार, माजी खेळाडू सुनील गावसकर म्हणाले, “कारकीर्दीच्या शेवटी, तुम्ही जिंकलेल्या ट्रॉफीच्या संख्येवर आणि तुमच्या विजयांच्या संख्येवरून तुमचा न्याय केला जातो. या दोन स्पर्धा जिंकल्याने तो भारताच्या महान कर्णधारांपैकी एक होईल.” टीम इंडियात अष्टपैलू खेळाडूंची कमतरता आहे, जी धोनीच्या टीममध्ये नव्हती, असं गावसकर यांनी सांगितलं आहे. याबाबत माजी क्रिकेटपटूंनी आपले मत मांडले आहे.

हेही वाचा: Asia Cup 2023: मोठी बातमी! के.एल. राहुलचे पुनरागमन टीम इंडियाला पडणार महागात? पाकिस्तान-नेपाळविरुद्धच्या सामन्यातून बाहेर

भारताकडे अष्टपैलू खेळाडूंची कमतरता आहे

अष्टपैलू खेळाडूंच्या कमतरतेबद्दल, गावसकर म्हणाले की, “काही गोष्टींपेक्षा आजच्या दिवसाचे नशीब खूप महत्वाचे असते. जर तुम्ही १९८३, १९८५ आणि २०११च्या संघांवर नजर टाकली तर त्या सर्वांमध्ये अव्वल दर्जाचे अष्टपैलू खेळाडू होते. तुमच्याकडे ७-८-९ षटके टाकणारे फलंदाज आणि क्रमवारीत फलंदाजी करू शकणारे गोलंदाज होते. हा त्या संघांचा सर्वात मोठा प्लस पॉइंट होता. तुम्ही माहीची टीम देखील तपासू शकता. त्याच्याकडे सुरेश रैना, युवराज सिंग, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग असे सगळे अष्टपैलू गोलंदाज होते. हा सर्वात मोठा अ‍ॅडव्हान्टेज होता. त्यामुळे ज्या संघात अष्टपैलू खेळाडू असतील तो आपली विजयाची दावेदारी पक्की करेल.”

लिटिल मास्टर पुढे म्हणाले की, “गेल्या वर्षी टी२० विश्वचषक जिंकणाऱ्या इंग्लंडकडे तुम्ही बघा. त्यांच्याकडे असलेले अष्टपैलू खेळाडू पाहता यतील. त्यामुळे अष्टपैलू खेळाडू हे संघातील महत्त्वाचे घटक आहेत. आमच्याकडे अफाट प्रतिभा आहे परंतु, बाद फेरीत तुम्हाला थोडी नशिबाची साथ हवी. बाद फेरीतील आमची परिस्थिती पाहिल्यास तिथे आम्ही नेहमीच पराभूत झालो आहोत, प्रत्येक वेळी अपयशच आमच्या पदरी पडले आहे, हे टीम इंडियाचे दुर्दैवच!”

हेही वाचा: National Sports Day: तीन खेळाडूंनी स्पोर्ट्स डे केला खास; आठवडाभरात देशाला सुवर्ण, रौप्य अन् कांस्यपदक मिळाले

भारताला शुभेच्छांची गरज आहे- सुनील गावसकर

गावसकरांनी चाहत्यांना विनंती केली आहे. ते म्हणाले, “गेल्यावेळी विश्वचषक २०१९ मध्ये, आमचा एक सामना वाईट होता आणि तो म्हणजे न्यूझीलंड विरुद्धची सेमीफायनल. हा सामना पावसामुळे दुसऱ्या दिवसापर्यंत लांबला. जर तो दिवसभर चालला असता तर कदाचित निकाल भारताच्या बाजूने लागला असता. कारण दुस-या दिवशी परिस्थिती बेताची होती आणि न्यूझीलंडचे गोलंदाज चांगली गोलंदाजी करू शकत होते. त्यामुळे त्यादिवशी तुम्हाला नशिबाची थोडी गरज आहे असे मला वाटते. विश्वचषकात चार-पाच खूप चांगले संघ आहेत, त्यामुळे लक फॅक्टर हा घटक फार गरजेचा असणार आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why havent rohit and kohli won the world cup under their captaincy sunil gavaskar told the reason avw
Show comments