USA Cricket Board suspended by ICC for 12 months : अमेरिकन क्रिकेट बोर्डाला आयसीसीकडून मोठा धक्का बसला आहे. आयसीसीने अमेरिकन क्रिकेटला १२ महिन्यांसाठी निलंबित केले आहे. आयसीसीने अमेरिकेला या निलंबनादरम्यान आपल्या कामकाजाच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यास सांगितले आहे जेणेकरून ते त्यातून अपेक्षित परिणाम साध्य करू शकतील. तसे झाले नाही तर अमेरिकन क्रिकेट बोर्डाला दीर्घकाळ निलंबित केले जाईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रीलंकेतील कोलंबो येथे सोमवारी झालेल्या आयसीसी बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत अमेरिकेकडून टी-२० विश्वचषकाच्या यजमानपदाचा आढावा घेण्याचा निर्णयही घेण्यात आला, ज्यामुळे जागतिक संघटनेचे अनेक अधिकारी अडचणीत आले आहेत. या गोष्टीचा आढावा घेण्यासाठी साठी आयसीसीने एक समिती स्थापन केली असून त्यात दक्षिण आफ्रिकेचा लॉसन नायडू, सिंगापूरचा इम्रान ख्वाजा, न्यूझीलंडचा रॉजर टॉस यांचा समावेश आहे.

टी-२० विश्वचषकाचा आढावा घेण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन –

आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे की, “आयसीसी बोर्ड पुष्टी करतो की टी-२० विश्वचषक ज्या प्रकारे आयोजित केला गेला आहे, त्याचा आढावा घेतला जाईल. लॉसन नायडू, इम्रान ख्वाजा आणि रॉजर टॉस यांच्या देखरेखीखालील समिती आपला अहवाल बोर्डाला सादर करेल.” टी-२० विश्वचषक २०२४ नंतर आयसीसीच्या दोन अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता. ज्यामध्ये क्लेअर फर्लाँग आणि ख्रिस टेटली यांचा समावेश होता. क्रिकबझच्या माहितीनुसार, आयसीसीने जरी दोघेही आपली पदे सोडतील असे सांगितले असले तरी ते आधीच अपेक्षित होते.

हेही वाचा – ‘मृत्यूला आम्ही खूप जवळून पाहिलं, तो आमचा शेवटचा दिवस असता’; मोहम्मद शमीने सांगितला कार अपघाताचा प्रसंग

आयसीसीने ठरवलेल्या प्रशासनाच्या मानकांमध्ये अमेरिका बसत नाही –

त्याचवेळी आयसीसीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अमेरिकन क्रिकेट बोर्डातील प्रशासन चांगले नाही आणि त्यामुळे ते सध्या आयसीसीच्या मानकांमध्ये बसत नाही. अमेरिकेबरोबरच चिलीचे क्रिकेट बोर्डालाही १२ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. आयसीसीने निवेदनात सांगितले की, “अमेरिका क्रिकेट आणि क्रिकेट चिली दोन्ही बोर्डांना त्यांचे कामकाज सुधारण्यासाठी आणि स्वत: ला आयसीसी सदस्यत्व मानकांनुसार सिद्ध करण्यासाठी अधिकृतपणे १२ महिन्यांची नोटीस देण्यात आली आहे. दोन्हीपैकी कोणताही बोर्ड आयसीसीने ठरवलेल्या प्रशासनाच्या मानकांमध्ये फिट बसत नाही.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why icc suspends usa and chile cricket for 12 months after t20 world cup 2024 vbm