Ben Stokes On England Team: इंग्लंड कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने एकदिवसीय सामन्यांमध्ये आपला संघ सतत पराभवाचा सामना का करत आहे हे सांगितले आहे. आम्हाला सांगूया की इंग्लंड संघाने अलीकडेच ऑस्ट्रेलियाकडून तीन सामने गमावल्यानंतर एकदिवसीय मालिका ०-३ ने गमावली. त्यानंतर इंग्लंडचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला असून, तेथे एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यातही संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे इंग्लंडचा संघ सलग ४ सामने पराभूत झाला आहे. बेन स्टोक्सने सलग पराभवांबाबत आपल्या संघाचा बचाव केला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातील पराभवानंतर विस्डेनने एक ट्विट करून विचारले की एकदिवसीय मध्ये इंग्लंडच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण काय आहे? हे ट्विट रिट्विट करत बेन स्टोक्स म्हणाला की, “S ने सुरु होणारी आणि E ने शेवट होणारी गोष्टीच्या मध्ये (chedul) चेडुल पण येते.” तसेच तो पुढे संघाचा बचाव जरी करत असला तरी खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनुसार जर भारतात होणाऱ्या २०२३च्या विश्वचषकाआधी असेच सुरु राहिले तर वरिष्ठ खेळाडूं संदर्भात वेगळा निर्णय घेतला जाऊ शकतो.” मात्र यावर जॉस बटलरने मौन बाळगले आहे.
याआधी इंग्लिश कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने थेट वेळापत्रकाला जबाबदार धरत ज्यामुळे त्याने एकदिवसीय फॉरमॅटमधूनही निवृत्ती घेतली आहे. त्याच्या कारकिर्दीच्या शिखरावर असूनही, बेन स्टोक्सने कसोटी आणि टी२० फॉरमॅटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी एकदिवसीय फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. २०१९ मध्ये झालेल्या शेवटच्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात स्टोक्स इंग्लंडसाठी हिरो ठरला आणि त्याच्या शानदार कामगिरीमुळे त्याच्या संघाने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता. त्याच सामन्यात स्टोक्स सामनावीर देखील ठरला होता.
बेन स्टोक्सचे एकदिवसीय संघात पुनरागमन होणार का?
दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या इंग्लंडच्या एकदिवसीय संघाला सध्या अनेक बड्या खेळाडूंची उणीव भासत आहे. जो रूट, जॉनी बेअरस्टो आणि लियाम लिव्हिंगस्टन यावेळी इंग्लंड संघात नाहीत. हॅरी ब्रूकनेही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पदार्पण केले होते, पण त्याला त्याचा कसोटीतील फॉर्म पुढे चालू ठेवता आला नाही.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यापूर्वी स्टोक्सबद्दल बोलताना इंग्लंड एकदिवसीय संघाचा कर्णधार जोस बटलर म्हणाला की, “जर त्याला (स्टोक्स) विचार बदलायचा असेल तर त्याचे स्वागतच आहे, पण तो उपलब्ध नसल्यास आम्ही आमच्या योजनांवर ठाम राहू.”