Jay Shah ICC New Chairman: जय शाह यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे, १ डिसेंबर २०२४ पासून ते या पदावर रुजू होणार आहेत. आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी सादर करणारे जय शाह हे एकमेव उमेदवार होते. तर फॉर्म भरण्याची अंतिम तारीख २७ ऑगस्ट होती. ३५ वर्षीय जय शाह हे आयसीसीचे अध्यक्ष होणारे सर्वात तरुण व्यक्ती आहेत. आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बीसीसीआयचे सचिव म्हणून ते पदउतार होतील.

जय शाह यांचे आयसीसी अध्यक्ष होणं हे अगदी महत्त्वपूर्ण क्षणी आले आहे, जेव्हा क्रिकेट लॉस एंजेलिस ऑलिम्पिक २०२८ मधून ऑलिम्पिक खेळांमध्ये पदार्पण करेल. आयसीसीचे अध्यक्ष म्हणून तीन वर्षे शाह या पदावर असतील, त्याशिवाय आणखी तीन वर्षे ते या पदावर कार्यरत राहण्याचा पर्यायही असेल. म्हणजेच एकूण सहा वर्षे क्रिकेटला खऱ्या अर्थाने जागतिक खेळ म्हणून स्थान देण्याची संधी जय शाहांकडे असेल.

स्मृती इराणी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार? केजरीवालांना शह देण्यासाठी भाजपाचा प्लान काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Delhi Elections 2025 : स्मृती इराणी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार? केजरीवालांना शह देण्यासाठी भाजपाचा प्लान काय?
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Sanjay Raut On Dhananjay Munde and PM Modi Mumbai Visit
Dhananjay Munde : “…मग धनंजय मुंडेंवर अन्याय का?”, PM मोदींच्या कार्यक्रमापासून दूर ठेवल्याच्या मुद्यावर राऊतांचा थेट सवाल
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : सत्ताधाऱ्यांच्या लांगूलचालनाचे उदाहरण
Anil Deshmukh criticized BJP and amit shah
बोलघेवडेपणा करू नका!अमित शहा यांच्या नेत्यांना कानपिचक्या
Devendra Fadnavis On Local Body Election
Devendra Fadnavis : आगामी महापालिकेच्या निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “पुढील तीन-चार महिन्यांत…”
BJP maharashtra Working president Ravindra Chavan
Ravindra Chavan: रवींद्र चव्हाण यांची अखेर भाजपाच्या कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी वर्णी; राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांची घोषणा
Hasan Mushrif
Hasan Mushrif : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत हसन मुश्रीफ यांचं विधान चर्चेत; म्हणाले, “आता पुढील निवडणुकीच्या…”

हेही वाचा: Jay Shah ICC Chairman: जय शाह यांची ICC च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड, जागतिक क्रिकेटमध्ये आता भारताचा दबदबा

“आयसीसी अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे मी भारावून गेलो आहे. जागतिक क्रिकेटला पुढे नेण्यासाठी मी आयसीसी संघ आणि आमच्या सदस्य राष्ट्रांसोबत काम करण्यास वचनबद्ध आहे. आम्ही एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर उभे आहोत जिथे अनेक स्वरूपांच्या सह-अस्तित्वाचा समतोल राखणे, नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आणि नवीन जागतिक बाजारपेठांमध्ये आमच्या प्रमुख कार्यक्रमांची ओळख करून देणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. क्रिकेटला आणखी लोकप्रिय बनवण्याचा आमचा उद्देश आहे.”

“जगभर क्रिकेटला अधिक पसंती मिळावी यासाठी अधिक विचार करण्याची गरज आहे. लॉस एंजेलिस ऑलिम्पिक २०२८ मध्ये क्रिकेटचा समावेश केल्याने क्रिकेट वाढत असल्याचे दिसून येते. मला विश्वास आहे की हा खेळ अभूतपूर्व मार्गांनी पुढे जाईल”

हेही वाचा – Jay Shah ICC Chairman : गुजरात क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी ते आयसीसीचे सर्वेसर्वा, जाणून घ्या जय शाहांची वाटचाल

मार्क बार्कले यांनी तिसऱ्यांदा या पदासाठी दावेदारी न सांगता पदउतार होण्याचा निर्णय घेतल्यावर जय शाह यांचे नाव समोर आले. क्रिकेटमधील प्रशासकिय विभागात जय शाह यांचा वाढता प्रभाव आणि स्थिरता यावरून शाह यांना ही मोठी संधी मिळाली. २००९ मध्ये गुजरात क्रिकेट असोसिएशनमध्ये कार्यकारी मंडळ सदस्य म्हणून सामील झाल्यानंतर, ते २०१३ मध्ये त्याचे सह-सचिव बनले. २०१९ मध्ये, त्यांची बीसीसीआय सचिव म्हणून निवड झाली, ज्या पदावर ते आजपर्यंत कार्यरत आहेत. ते आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्षही आहेत.

ICC अध्यक्ष म्हणून जय शाह यांच्यासमोरील आव्हाने

जगमोहन दालमिया, शरद पवार, एन श्रीनिवासन, शशांक मनोहर यांच्यानंतर आयसीसीचे हे सर्वोच्च पद भूषवणारे जय शाह हे पाचवे भारतीय आहेत. या पदावर कार्यरत असताना शाह यांच्यासमोरही अनेक आव्हाने आहेत, कारण क्रिकेट तिन्ही फॉरमॅटमध्ये योग्य संतुलन साधण्यासाठी प्रयत्न करत आहे. शहा म्हणाले की, कसोटी क्रिकेट जपण्यासाठी अधिक लक्ष दिले जाईल. “टी-२० हे नैसर्गिकरित्या रोमांचक स्वरूप असले तरी कसोटी क्रिकेटला प्रत्येकाने प्राधान्य देणे तितकेच महत्त्वाचे आहे कारण ते या खेळाचा पाया आहे. क्रिकेटपटूंना क्रिकेटच्या या मोठ्या फॉरमॅटकडे आणेल यासाठी आम्ही प्रयत्न करणे गरजेचे आहे आणि आमचे प्रयत्न या ध्येयाच्या दृष्टीने असतील. ”

हेही वाचा – VIDEO: सुवर्णपदक विजेत्या भालाफेकपटूने सुपर ओव्हरमध्ये संघाला जिंकून दिला सामना, भारताच्या जेमिमा रॉड्रीग्जने दिली साथ

जय शाहांच्या निवडीमुळे आयसीसीमध्ये बीसीसीआयची स्थिती बळकट होतील अशी भीती असली तरी, त्यांनी कसोटी क्रिकेटला पाठिंबा देण्यासाठी निधी सादर करण्याच्या योजनेसह काही पावले उचलली आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या पुढाकाराने, BCCI आणि ECB चा पाठिंब्यासह कसोटी क्रिकेटपटूंना कॉमन पूलमधून १० हजार डॉलर्स मिळतील. हा शाह यांचा पहिलाच मोठा निर्णय असण्याची शक्यता आहे.

कसोटी क्रिकेटसाठी निधी

कसोटी सामन्यासाठी निधी उभारणे चांगली बाब असली तरी शाह यांना खेळाडूंना खूश ठेवण्याच्या आव्हानांना सामोरे जावे लागेल. दोन संघांमध्ये होणाऱ्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकांना फारसा अर्थ उरलेला नाही, असे जागतिक खेळाडू समितीने म्हटले आहे. जागतिक खेळाडूंनी एक वेगळी समिती स्थापन केली आहे, त्यांच्यातील चर्चेदरम्यान त्यांनी वरील निष्कर्ष दिला आहे. कसोटी सामन्यांसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध झाल्यानंतर आयसीसीच्या सध्याच्या ‘फ्यूचर टूर्स प्रोग्रॅम’ अर्थात भविष्यकालीन मालिकांमधील वनडे आणि ट्वेन्टी२० मालिकांची संख्या कमी होईल. कारण आयोजक बोर्ड किंवा संघटनांना पैशाकरता दोन देशांदरम्यानच्या वनडे किंवा टी२० मालिकेवर अवलंबून राहावे लागणार नाही.

हेही वाचा – जय शाह यांची मोठी घोषणा; BCCIकडून भारतीय क्रिकेटपटूंवर पैशांचा पाऊस, बक्षीस रक्कम जाहीर

शाह यांच्या समोर असलेली व्यावसायिक आव्हाने पाहता, बोर्डाच्या तिजोरीतह वाढ करताना बीसीसीआय सचिव म्हणून शाह यांचा अनुभव उपयोगी पडेल. बीसीसीआयचे सचिव असताना करोना महामारीच्या काळातही शाह यांनी बाहेरच्या देशात दोन वर्षे यशस्वी आयपीएलचे आयोजन केले. २०२३ मध्ये महिला प्रीमियर लीग सुरू करण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे, ज्यांनी महिला क्रिकेटसाठी अधिक निधी उपलब्ध करून दिला.

विशेषत: यंदा झालेल्या टी-२० विश्वचषकानंतर आयसीसीला समस्यांचा सामना करावा लागत आहे. बजेट ओव्हरशूट होण्याव्यतिरिक्त, खेळपट्ट्यांच्या निकृष्ट दर्जामुळे स्पर्धेची चमक कमी झाली. २०२७ पर्यंत चालणाऱ्या ब्रॉडकास्ट डीलवर पुन्हा चर्चा करण्याची विनंती ICC च्या प्रमुख ब्रॉडकास्टर्सपैकी एकाने आधीच केली आहे.

हेही वाचा – India Squad for Women’s T20WC: टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय महिला संघ जाहीर, श्रेयांका पाटीलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह, पाहा संपूर्ण संघ

“मी सहकार्यात्मक प्रयत्नांसह समृद्ध कार्यकाळाची अपेक्षा करतो, क्रिकेटच्या प्रगतीत येणारे अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करेन. आपल्यासमोर येणारे प्रत्येक आव्हान ही एक संधी असते आणि एकत्रित काम करत आपण समोर आलेल्या संकटाचे विजयात रूपांतर करू. क्रिकेटबद्दलची आपली आवड आणि त्याच्या विलक्षण क्षमतेवरचा आपला विश्वास याच्या जोरावर, एकत्र येऊन हा अविश्वसनीय प्रवास सुरू करूया,” असं जय शाह म्हणाले.

Story img Loader