Kolkata Knight Riders deducted Rs 12 crore after IPL 2025 Retentions : आयपीएलचा १८वा हंगाम २०२५ मध्ये खेळवला जाणार आहे, पण त्याआधी खेळाडूंचा मोठा लिलाव पार पडणार आहे. ज्यासाठी सर्व फ्रँचायझींनी त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये आयपीएल २०२४ ची ट्रॉफी जिंकणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्स संघाने एकूण ६ खेळाडूंना कायम ठेवण्यासाठी आपल्या १२० कोटीच्या पर्समधून १७ कोटी रुपये खर्च केले. परंतु आता त्यांच्या पर्समधून १२ कोटी रुपये अधिक कापले गेले आहेत, यामागे आयपीएल गव्हर्निंग काउंसिलचा मोठा नियम कारणीभूत ठरला आहे. तो काय नियम आहे? जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केकेआरच्या पर्समधून १२ कोटी का कापण्यात आले?

आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनपूर्वी कोलकाता नाईट रायडर्स संघाने रिंकू सिंगला १३ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले, तर त्यांनी वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन आणि आंद्रे रसेल यांना प्रत्येकी १२ कोटी रुपयांना कायम ठेवले आहे. तसेच हर्षित राणा आणि रमणदीप सिंग यांना प्रत्येकी ४ कोटी रुपयांमध्ये अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवले. अशा प्रकारे ६ खेळाडूंना कायम ठेवण्यासाठी केकेआरने एकूण ५७ कोटी रुपये खर्च केले असताना, प्रत्येक स्लॉटसाठी एक रक्कम आयपीएल गव्हर्निंग काउंसिलने आधीच निश्चित केली होती. ज्यामुळे त्यांना १२ कोटींचा फटका बसला आहे.

रिटेन करण्यात येणाऱ्या खेळाडूंसाठी आयपीएल गव्हर्निंग काउंसिलने निश्चित केलेल्या रुपयांपेक्षा कमी पैसे दिल्यास, उर्वरित पैसे फ्रँचायझीच्या पर्समधून कापले जाातात. नेमके तेच केकेआर फ्रँचायझीच्या बाबतीत घडले आहे. केकेआरने रिंकू सिंगला पहिला रिटेन केलेला खेळाडू म्हणून त्याला १३ कोटी रुपये दिले, तर आयपीएलच्या नियमांनुसार, पहिल्या रिटेन केलेल्या खेळाडूला १८ कोटी द्यावे लागतात. परंतु केकेआरने या नियमाचा भंग केल्याने त्यांच्या पर्समधून ५ कोटी रुपये कापले गेले. तसेच वरुण चक्रवर्तीलाही दोन कोटी रुपये कमी दिले आहेत.

हेही वाचा – Ravindra Jadeja : रवींद्र जडेजाने इशांत-झहीरला मागे टाकत केला मोठा पराक्रम, भारतासाठी ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पाचवा गोलंदाज

तिसरा रिटेन खेळाडू म्हणून केकेआरने सुनील नरेनला १२ कोटी रुपये दिले, ज्यात त्यांनी आयपीएलने निश्चित केलेल्या रक्कमेपेक्षा १ कोटी रुपये जास्त खर्च केले. तसेच चौथ्या रिटेन केलेल्या खेळाडूला १८ कोटी रुपये द्यायला हवे होते, पण केकेआरने आंद्रे रसेलला १२ कोटी रुपये देऊन रिटेन केले. म्हणजे त्याला ६ कोटी रुपये कमी दिले. अशाप्रकारे केकेआरने केवळ ५७ कोटी रुपये खर्च केले पण त्यांच्या पर्समधून आयपीएलच्या नियमाचा भंग केल्याने १२ कोटी रुपयांची कपात करण्यात आली आहे.

लिलावासाठी केकेआरकडे फक्त ५१ कोटी रुपये शिल्लक –

आयपीएल २०२५ च्या हंगामासाठी प्रत्येक संघासाठी १२० कोटींची पर्स निश्चित केली आहे. या १२० कोटींपैकी ५७ कोटी रुपये केकेआरने संघाने ४ कॅप्ड आणि २ अनकॅप्ड खेळाडूंना रिटेन करण्यासाठी खर्च केले. त्याचबरोबर आयपीएल गव्हर्निंग काउंसिलच्या नियमाचा भंग केल्याने त्यांना १२ कोटीचा फटका बसला आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडे आयपीएल २०२५ च्या मोठ्या लिलावातून उर्वरित खेळाडू खरेदी करण्यासाठी फक्त ५१ कोटी रुपये शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी इतक्या कमी पैशात संघबांधणीसाठी चांगले खेळाडूंची निवड करणे सोपे काम असणार नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why kolkata knight riders cut rs 12 crore after ipl 2025 retentions know about vbm