Mohammed Shami is not selected Border-Gavaskar Trophy Squad : बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी शुक्रवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यापैकी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघाच्या निवडीमध्ये अनेक आश्चर्यकारक गोष्टी पाहायला मिळाल्या आहेत. विशेष बाब म्हणजे मोहम्मद शमीची संघात निवड करण्यात आलेली नाही, जो अलीकडेच बेंगळुरू कसोटीनंतर सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांना गोलंदाजी करताना दिसला होता. त्यामुळे मोहम्मद शमीची निवड का करण्यात आली नाही? जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बऱ्याचदा मोहम्मद शमीने स्वत: सोशल मीडियावर सतत तंदुरुस्त असल्याचे पोस्ट करून सांगितले आहे, त्यामुळे त्याची निवड का झाली नाही हे समजण्यापलीकडचे आहे. घोट्याच्या शस्त्रक्रियेतून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोहम्मद शमीची अनुपस्थिती ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्या पुनर्वसनाची प्रगती असूनही, नुकत्याच त्याच्या गुडघ्याला आलेल्या सूजेमुळे त्याच्या उपलब्धतेवर शंका निर्माण झाली आहे. मात्र, शमीने रविवारी सोशल मीडियावर नेटमध्ये गोलंदाजी करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला.

मोहम्मद शमीची निवड का नाही?

जर शमीला दुखापत झाली असेल तर बीसीसीआयने २५ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती द्यायला हवी होती. जे त्यात नाही. वास्तविक, कुलदीप यादवच्या दुखापतीची माहिती बीसीसीआयच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, कुलदीप यादव ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडीसाठी उपलब्ध नसल्याने त्याची निवड करण्यात आली नाही. कारण न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेनंतर त्याला कंबरेच्या तीव्र कंबरदुखीच्या समस्येमुळे बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पाठवण्यात आले होते.

हेही वाचा – IND vs NZ : १२ वर्षांनंतर भारताला मायदेशात कसोटी मालिका गमावण्याचा धोका, इतिहास बदलणार का?

२२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताने आपल्या १८ सदस्यीय संघात अभिमन्यू ईश्वरन, वेगवान गोलंदाज हर्षित राणा आणि अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी या तीन नवीन खेळाडूंचा समावेश केला आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, मुकेश कुमार, नवदीप सैनी आणि खलील अहमद यांना प्रवासी राखीव खेळाडू म्हणून संघात समाविष्ट केले आहे.

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.

हेही वाचा – IND vs NZ : संजय मांजरेकरांनी कोहलीबद्दल केलेल्या ट्वीटमुळे पेटला नवा वाद, विराट-रोहितच्या चाहत्यांमध्ये सोशल मीडियावर जुंपली

राखीव खेळाडू : मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why mohammed shami is not selected in india test squad for the border gavaskar trophy against australia test series vbm