Why No Victory Bus Parade Celebration for Team India After Champions Trophy Win: भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध मोठा विजय नोंदवत पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियन ठरले. भारताच्या या विजयानंतर देशाच्या कानाकोपऱ्यात चाहत्यांनी जल्लोष सुरू केला. दिल्लीपासून मुंबईपर्यंत, कोलकाता ते अहमदाबादपर्यंत सर्वत्र चाहते तिरंगा झेंडा घेऊन रस्त्यावर उतरलेले दिसत होते. आता सर्वच चाहत्यांना भारतातील टीम इंडियाच्या विजयाच्या परेडची प्रतीक्षा आहे. गेल्या वर्षी टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर भारताने मुंबईत विजयी परेड काढली होती.

भारताने ट्रॉफी जिंकताच चाहत्यांना मुंबईत झालेल्या टी-२० विश्वचषक २०२४ ची विश्वचषक विजय परेडची आठवण झाली. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकूनही भारतीय संघ विजयाच्या परेडमध्ये सहभागी होईल, अशी आशा चाहत्यांना वाटत होती. मात्र यावेळी तसे होणार नाही. पण यामागचे नेमकं कारण काय आहे जाणून घेऊया.

भारतीय संघाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ नंतर विजयी परेड होणार नसल्याची बातमी समोर आली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आयपीएल २०२५. येत्या २२ मार्चपासून आयपीएल सुरू होत असून खेळाडूंना विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.

२०२५ च्या हंगामासाठी आयपीएल संघांनी तयारी सुरू केली आहे आणि भारतीय संघाचा भाग असलेल्या सर्व खेळाडूंना हंगामापूर्वी थोड्या विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूला एक छोटा ब्रेक दिला जाईल. सर्वच खेळाडू वेगवेगळ्या ठिकाणी राहत असून ते आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवतील. भारताने १२ वर्षांचा दुष्काळ संपवत २० षटकांच्या फॉरमॅटमधील आयसीसी ट्रॉफीवर कब्जा केला.

भारतीय फिरकीपटूंनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना धावा करण्याची फारशी संधी दिली नाही. फिरकीपटूंनी एकूण ५ विकेट घेतल्या, त्यामुळे किवी संघाने ७ विकेट गमावून एकूण २५१ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्माने धमाकेदार फलंदाजी करत ८३ चेंडूत ७६ धावा केल्या. केएल राहुल क्रीजवर राहिला आणि त्याने नाबाद ३४ धावा केल्या आणि भारताला ४ विकेट्सने विजय मिळवून दिला.

Story img Loader