Novak Djokovic wins Gold Medal & gets emotional: उत्तुंग, उदात्त असं काही पाहिलं की एकदम भारी वाटतं, स्फुरण चढतं आणि त्याचवेळी छाती दडपूनही जाते. एकदम खजील वाटतं. आपण एकदमच लुख्खा असल्याची जाणीव होते. घर आहे, जेवायला आहे, नोकरी आहे हे असूनही आपल्या हातून उल्लेखनीय काही घडत नसल्याची टोचणी राहते. या जीवनाचं काय करू? या शीर्षकाचं अभय बंगांचं पुस्तक आहे. युवा वर्गासाठी त्यांनी केलेल्या भाषणांचा संग्रह आहे. नोव्हाक जोकोव्हिचला पाहिल्यावर तिशीत आलेल्या आणि चाळिशीकडे झुकलेल्या बहुतांश माणसांना हेच वाटतं. ३७व्या वर्षी सर्वसाधारण माणसं करिअरमध्ये चढउताराची सापशिडी खेळत असतात. जोकोव्हिच ३७व्या वर्षी संपृक्तावस्थेत आहे. टेनिसविश्वात जे जे जिंकण्यासारखं आहे ते त्याचं जिंकून झालंय. रविवारी संध्याकाळी जोकोव्हिचने सर्बियासाठी सुवर्णपदक जिंकलं आणि एक अनोखं वर्तुळ पूर्ण झालं. संघर्ष कोणाला चुकलेला नाही. खाचखळगे सगळ्यांनाच लागतात. प्रश्न फेर धरतात, समस्या वेढा देतात, अडचणी मानगुटीवर बसतात. आपण या सगळ्यांच्या गर्तेत सापडतो. जोकोव्हिचही सापडतो पण तो वाट काढतो. काट्याकुट्यातून का असेना, ठेचकाळत तो येतोच.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा