Shubman Gill Catch Controversy: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३च्या अंतिम सामन्यात भारताला विजयासाठी ४४४ धावांचे लक्ष्य मिळाले होते. भारतीय संघ चौथ्या डावात फलंदाजीसाठी उतरला तेव्हा चौथ्या दिवशी चहापानाच्या विश्रांतीपूर्वीच कॅमेरून ग्रीनने भारतीय सलामीवीर शुबमन गिलचा वादग्रस्त झेल टिपला. यावरून आता त्याला ‘सॉफ्ट सिग्नल’चा फायदा का नाही मिळाला? असे प्रश्न क्रिकेट वर्तुळात विचारले जात आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जेव्हा कॅमेरून ग्रीनने शुबमन गिलचा वादग्रस्त झेल टिपला तेव्हा मैदानावरील अंपायरनी गिलला आऊट न दिल्याने तो निर्णय थर्ड अंपायरकडे वळवण्यात आला. थर्ड अंपायरला ग्रीनने पकडलेला कॅच योग्य वाटला आणि त्यांनी गिलला बाद घोषित केले. यानंतर सोशल मीडियावर ग्रीनच्या झेलवरून बरीच चर्चा झाली, पण यादरम्यान सॉफ्ट सिग्नलचा वापर का करण्यात आला नाही हा सर्वात मोठा प्रश्न होता. यावर आता खुद्द आयसीसीनेच उत्तर दिले आहे.
आयसीसीने दिले ‘सॉफ्ट सिग्नल’ वर उत्तर
शुबमन गिल १८ धावा करून कॅमेरून ग्रीनकडे झेलबाद झाला. मात्र, मैदानावर त्याच्यासोबत उभा असलेला कर्णधार रोहित शर्माही खूश नव्हता ना गिलला. हा सामनाही वादग्रस्त दिसला, कारण वीरेंद्र सेहवाग, वसीम जाफर, हरभजन सिंग यांच्यासह सर्व क्रिकेटपटूंनी हा क्लीन कॅच नसल्याचे सांगितले आणि शुबमन गिलला तिसऱ्या अंपायरने नॉट आऊट द्यायला हवे होते. याशिवाय, आयसीसीनेही सॉफ्ट सिग्नलबाबत एक निवेदन जारी केले आहे, त्यात त्यांनी म्हटले आहे की, “हा नियम रद्द करण्यात आला आहे. क्रिकेटच्या MCC कायद्याच्या ३३.३मध्ये याचा उल्लेख आहे.”
निर्णय प्रक्रियेत सॉफ्ट सिग्नल नसल्यामुळे ही घटना विशेषतः लक्षणीय होती. जूनच्या सुरुवातीला ICC खेळण्याच्या अटींमधून सॉफ्ट सिग्नल नियम काढून टाकण्यात आला. नवीन नियम पहिल्यांदा लागू झाले जेव्हा इंग्लंडने एका आठवड्यापूर्वी लॉर्ड्सवर आयर्लंडविरुद्ध एकदिवसीय कसोटी खेळली होती. मे महिन्यातच, ICC ने सांगितले होते की “मैदानावरील अंपायर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी (क्लीन कॅचच्या बाबतीत) टीव्ही अंपायरचा सल्ला घेतील. ICC क्रिकेट समितीला असे आढळून आले की सॉफ्ट सिग्नल अनावश्यक आणि काही वेळा गोंधळात टाकणारा असतात, कारण रिप्लेमुळे कॅचचे संदर्भ काही वेळेस बदलतात आणि त्यामुळे काही वेळेस चुकीचे निर्णय दिले जाऊ शकतात.”
कसा झेलबाद झाला शुबमन गिल?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलियानं भारताला ४४४ धावांचं लक्ष्य दिलं आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना शुबमन गिल आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. गिल १८ धावांवर असताना स्कॉट बोलँडचा एक चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन स्लिपमध्ये गेला. तिथे कॅमेरॉन ग्रीन क्षेत्ररक्षण करत होता. ग्रीनने डावीकडे डायव्हिंग करत तो चेंडू पकडला. यानंतर त्याने विकेट मिळाल्याचा आनंद साजरा करण्यास सुरुवात केली. पण गिल तिथेच उभा राहिला. यानंतर मैदानावरील अंपायरने ‘सॉफ्ट सिग्नल’ न देता थर्ड अंपायरची मदत घेतली. अलीकडे, अशा वादग्रस्त झेलांच्या बाबतीत, आयसीसीने सॉफ्ट सिग्नलचा नियम रद्द केला आहे. अशाप्रकारे यानंतर मैदानावरील अंपायरने तिसऱ्या अंपायरची मदत घेण्याची ही पहिलीच वेळ होती.