Pakistan’s Fan Trolls BCCI and India: भारत-इंग्लंड दुसरा वनडे सामना ओडिशामधील कटक येथे खेळवला गेला. कटकमधील बाराबती क्रिकेट स्टेडिमयवर भारतीय संघ तब्बल ६ वर्षांनी खेळण्यासाठी उतरला होता. भारताने या मैदानावर रोहित शर्माच्या शतकासह एक दणदणीत विजय मिळवत मालिकाही आपल्या नावे केली आहे. भारताच्या या विजयानंतर पाकिस्तानी चाहते आता बीसीसीआय आणि भारताला ट्रोल करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताच्या डावादरम्यान दुसऱ्या वनडे सामन्यात फ्लडलाईट्स बंद झाल्याने सामना थांबवण्यात आला होता. फ्लडलाईट्स एकदा बंद झाल्यानंतर काही वेळाने सामना पुन्हा सुरू झाला. पण दुसऱ्यांद संपूर्ण फ्लडलाईट्स बंद झाल्या. यामुळे जवळपास ३५ मिनिटं सामना थांबवण्यात आला होता.

भारतीय संघाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी चांगली सुरूवात केली होती. भारतीय संघ ६ षटकांनंतर बिनबाद ४८ धावांवर खेळत होता. रोहित शर्मा चांगल्या फॉर्मात होता, तर गिलनेही त्याला चांगली साथ दिली होती. पण फ्लडलाईट्सने व्यत्यय आणल्याने सामना थांबला. जवळपास ४५ हजार चाहते हा सामना पाहण्यासाठी पोहोचले होते. पण भारतीय मैदानांवर फ्लडलाईट्स बंद होणं ही घटना अगदी क्वचितच घडणारी आहे. पण कटकमध्ये घडलेल्या या घटनेचा फायदा पाकिस्तानच्या चाहत्यांनी घेतला असून त्यांनी बीसीसीआय आणि भारताला ट्रोल केलं आहे.

२ दिवसांपूर्वीच पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील तिरंगी मालिकेत न्यूझीलंडचा खेळाडू रचिन रवींद्र याला मैदानावर दुखापत झाली होती. त्याच्या या दुखापतीचं खापर गद्दफी स्टेडियममधील नव्या फ्लडलाईट्सवर फोडण्यात आलं होतं. चॅम्पियन्स ट्रॉफीकरता या स्टेडियममध्ये नवे लाईट्स बसवण्यात आले आहेत. रचिन रवींद्र झेल पकडण्याच्या तयारीत होता पण तो चेंडू नीट पाहू शकला नाही आणि त्याच्या कपाळावर जाऊन बसला.

आता भारताचा त्यांच्या देशात फ्लडलाईट्समुळे सामना थांबल्याने पाकिस्तानी चाहत्यांना बोलण्याची संधी मिळाली आहे. पाकिस्तानी चाहते म्हणाले, हे आहे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड. कर्म, सर्व इथेच फेडायचं आहे. पाकिस्तानला वाईट बोलल्याने बाराबती स्टेडियममधील लाईट्स जात आहेत का, असा प्रश्न पाकिस्तानी चाहत्यांनी विचारला.