Samit Dravid cant play under 19 world cup 2026 : राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली भारतीय क्रिकेट संघाने २०२४ ची टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकली. मुख्य प्रशिक्षक द्रविडचा कार्यकाळ टी-२० विश्वचषकानंतर संपुष्टात आला. आता द्रविडचा मुलगा समितनेही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवले आहे. १८ वर्षीय समित द्रविडची ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या वनडे आणि कसोटी मालिकेसाठी भारताच्या १९ वर्षाखालील संघात निवड झाली आहे. मात्र, तो २०२६ मध्ये होणाऱ्या अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत खेळू शकणार नाही. या मागे काय कारण आहे? जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समित हा उजव्या हाताचा उत्कृष्ट फलंदाज आहे. तो उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजीही करतो. २०२३-२४ हंगामात कूचबिहार ट्रॉफी जिंकणाऱ्या कर्नाटक अंडर-१९ संघाचा समित द्रविड देखील एक भाग आहे. लँकेशायर संघाविरुद्धच्या तीन दिवसीय सामन्यात त्याने कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन इलेव्हनचेही प्रतिनिधित्व केले. समित द्रविड महाराजा ट्रॉफी केएससीए टी-२० स्पर्धेत म्हैसूर वॉरियर्स संघाचा भाग आहे.

समित द्रविड अंडर-१९ विश्वचषक २०२६ का खेळू शकणार नाही –

समित प्रथमच अंडर-१९ स्तरावर भारताकडून खेळताना दिसणार आहे. समितची भारतीय अंडर-१९ संघात निवड झाली आहे. मात्र, तो २०२६ मध्ये होणाऱ्या अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत खेळू शकणार नाही. समितचा जन्म १० नोव्हेंबर २००५ रोजी झाला होता आणि तो त्याच्या १९ व्या वाढदिवसापासून दोन महिने दूर आहे. त्यामुळे जेव्हा २०२६ अंडर-१९ विश्वचषक होईल, तेव्हा त्याचे वय २० वर्षांपेक्षा जास्त असेल. पुढील १९ वर्षाखालील विश्वचषक झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये खेळवला जाणार आहे.

हेही वाचा – Suryakumar Yadav : बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी सूर्या दुखापतीतून सावरला नाही, तर कोण करणार टीम इंडियाचं नेतृत्त्व?

एकदिवसीय मालिकेसाठी संघ : रुद्र पटेल (उपकर्णधार), साहिल पारख, कार्तिकेय केपी, मोहम्मद अमन (कर्णधार), किरण चोरमले, अभिज्ञान कुंडू (डब्ल्यूके), हरवंशसिंग पनगालिया (यष्टीरक्षक), समित द्रविड, युधाजित गुहा, समर्थ एन. निखिल कुमार, चेतन शर्मा, हार्दिक राज, रोहित राजावत, मोहम्मद अनन

हेही वाचा – Rohit Sharma : ‘रोहितविरुद्ध अंपायरिंग करणे खूपच सोपे, कारण तो…’, अंपायर अनिल चौधरी हिटमॅनबद्दल काय म्हणाले?

चार दिवसीय कसोटी मालिकेसाठी संघ : वैभव सूर्यवंशी, नित्या पंड्या, विहान मल्होत्रा ​​(उपकर्णधार), सोहम पटवर्धन (कर्णधार), कार्तिकेय केपी, समित द्रविड, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंशसिंग पानगालिया (यष्टीरक्षक), चेतन शर्मा, समर्थ एन, आदित्य रावत, निखिल कुमार, अनमोलजीत सिंग, आदित्य सिंग, मोहम्मद अनन

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why rahul dravid son samit dravid wont be able to play in under 19 world cup 2026 after india u19 call up vbm