चॅम्पियन्स क्रिकेट स्पर्धेतील पंच मंडळातून पाकिस्तानचे पंच असाद रौफ यांची हकालपट्टी केल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष झाका अश्रफ यांनी आगपाखड केली आहे. रौफ यांची आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी कोणत्या कारणास्तव चौकशी करण्यात आली याचा तपशील आपल्याला माहीत नाही असे सांगून अश्रफ म्हणाले, रौफ यांच्या चौकशीतून पोलिसांना काहीही मिळालेले नाही. रौफ यांना चॅम्पियन्स स्पर्धेतून दूर करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कोणतेही ठोस कारण दिलेले नाही. जर आयसीसीने याबाबत कारण दिले तर आम्ही निश्चितपणे रौफ यांच्याविरुद्ध कारवाई करू. अशा घटना क्रिकेटच्या प्रतिष्ठेस धक्का देत आहेत. हा प्रश्न केवळ एक क्रिकेट मंडळ सोडवू शकत नाही. सर्व क्रिकेट मंडळांनी एकत्रितपणे ही समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
रौफ यांच्या हकालपट्टीमुळे पाकिस्तानचा थयथयाट
चॅम्पियन्स क्रिकेट स्पर्धेतील पंच मंडळातून पाकिस्तानचे पंच असाद रौफ यांची हकालपट्टी केल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष झाका अश्रफ यांनी आगपाखड केली आहे. रौफ यांची आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी कोणत्या कारणास्तव चौकशी करण्यात आली याचा तपशील आपल्याला माहीत नाही असे सांगून अश्रफ म्हणाले,
First published on: 25-05-2013 at 01:55 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why rauf is under investigation ask pcb