Rohit Sharma Dropped In 2011 ODI World Cup : भारतीय क्रिकेट संघाचे माजी निवडकर्ता राजा वेंकेट यांनी रोहित शर्माच्या २०११ मध्ये झालेल्या विश्वचषकाच्या निवडीबाबत मोठा खुलासा केला आहे. वेंकेट यांनी म्हटलं की, रोहित शर्माची त्यावेळी निवड झाली नव्हती, कारण कर्णधार एम एस धोनीला रोहितच्या जागेवर पीयुष चावलाची निवड करायची होती. संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टनही रोहितचा भारतीय संघात समावेश करणार होते. परंतु, धोनीने जेव्हा अशी मागणी केली, त्यावेळी गॅरी यांनीही धोनीच्या निर्णयाला साथ दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यावेळी रोहित शर्माला संघात न घेतल्यानं सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण रोहितचा नेहमीच वनडे क्रिकेटमध्ये सक्रीय सहभाग असायचा. तसंच २००७ च्या विश्वचषक विजेत्या टीम इंडियात रोहित शर्मा सामीला होता. रेव स्पोर्ट्सशी बोलताना वेंकेट यांनी म्हटलं की, “जेव्हा आम्ही संघ निवडीबाबत चर्चा करत होतो, त्यावेळी रोहित शर्मा खेळाडूंच्या सिलेक्शनच्या रेसमध्ये होता. जेव्हा आम्ही संघाची निवड प्रक्रिया सुरु केली, त्यावेळी १ ते १४ पर्यंतच्या सर्व खेळाडूंना सामील केलं. रोहित शर्मा १५ वा खेळाडू असेल, असाही पर्याय दिला.”

नक्की वाचा – ODI World Cup 2023: टीम इंडियाच्या ‘गंभीर’ परिस्थितीवर गौतमने दिली प्रतिक्रिया, शास्त्रींचा समाचार घेत म्हणाला, “डावखुरे फलंदाज…”

“गॅरी कर्स्टन यांना वाटलं की, हा सर्वात चांगला पर्याय आहे. परंतु, एम एस धोनीनं त्यावेळी बदल करण्याची मागणी केली. त्यांना रोहित शर्माच्या जागेवर पीयूष चावलाला संधी द्यायची होती. त्यानंतर गॅरी कर्स्टन यांनी तो निर्णय बदलून कर्णधार धोनीच्या रणनितीला हिरवा कंदील दाखवला. धोनीचं समर्थन करत गॅरी म्हणाले की, पीयुषचा पर्यायही चांगला आहे. यामुळेच रोहित शर्माला संघात जागा मिळाली नाही.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why rohit sharma dropped in odi world cup 2011 former national selector raja venkat ms dhoni decisions nss