Rohit Sharma Test Career: रोहित शर्माची ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील कामगिरी पाहता त्याच्या कसोटी कारकिर्दीला लवकरच पूर्णविराम लागणार असल्याचे म्हटले जात होते. यानंतर रोहित शर्माने स्वत: सिडनी कसोटीतून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आणि त्याला पाचव्या कसोटीतून वगळण्यात आले. यानंतर रोहित शर्माने मेलबर्नमध्ये त्याचा अखेरचा कसोटी सामना खेळल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर आता एका रिपोर्टमध्ये माहिती आली की, बीसीसीआयने रोहित शर्माला कळवले की, ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारताच्या कसोटी क्रिकेटमधील योजनांचा भाग नसणार आहे. यावरून आता रोहित लवकरच कसोटीतून निवृत्ती घेण्याची शक्यता आहे.

रोहितच्या कसोटी कारकिर्दीचा शेवट अगदी नाट्यमय झाल्याचे दिसत आहे. रोहितने त्याचा खराब फॉर्म पाहता स्वत: प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर होण्याचा मोठा निर्णय घेतला. रोहितला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एकाही सामन्यात दुहेरी आकडा गाठता आलेला नाही. यानंतर तो स्वत: संघाबाहेर झाला आहे. रोहितला वगळलं आहे की त्याने स्वत: बाहेर राहण्याचा निर्णय घेतला असा प्रश्नही उपस्थित होता. एकंदरीत रोहितच्या कसोटी कारकिर्दीचा शेवट अगदी नाट्यमय असल्याचे दिसत आहे. त्याचप्रमाणे त्याचं कसोटी पदार्पणही नाट्यमय झाले होते.

SL vs AUS Josh Inglis scores century on debut test match in front of parents breaks many records at Galle
SL vs AUS : जोश इग्लिसचे कसोटी पदार्पणात विक्रमी शतक! मोडले अनेक विक्रम
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Pulkit Samrat ex wife Shweta Rohira road accident
हाडं मोडली, ओठ चिरला अन्…; बॉलीवूड अभिनेत्रीचा भीषण अपघात, फोटो पाहून चाहते काळजीत
Rohit Sharma complains to BCCI about Sunil Gavaskar after blames his criticism BGT in Australia
Rohit Sharma : रोहित शर्माने बीसीसीआयकडे केली सुनील गावस्करांची तक्रार? नेमकं काय आहे कारण? जाणून घ्या
Viral Video
Viral Video : देव तारी त्याला कोण मारी… रस्ता ओलांडताना दोन बसमध्ये अडकला; Video पाहून नेटकरी थक्क
Viral Photo
Viral Photo : वॉचमन म्हणून दरवाजाबाहेर उभे राहिले, लेकाने २५ वर्षांनंतर त्याच फाइव्ह स्टार हॉटेलात बापाला घातले जेवू ; Photo चर्चेत
Manoj Tiwary says Gautam Gambhir and I would have had a fight that day
Gautam Gambhir : ‘…अन्यथा आमच्यात हाणामारी झाली असती’, गौतम गंभीरबरोबरच्या वादावर मनोज तिवारीचा मोठा खुलासा
Father of Saif stabbing accused speaks about missing legal documents after the incident.
Saif Ali Khan : सैफवरील हल्ल्यानंतर हल्लेखोराचा पहिला फोन कोणाला? वडील म्हणाले, “आमचा मुलगा असा…”

हेही वाचा – IND vs AUS: “तुझा प्रॉब्लेम काय आहे?”, कॉन्टासने घातला बुमराहशी वाद, मधल्या मध्ये गेला ख्वाजाचा बळी; VIDEO व्हायरल

रोहितने वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध केल्यानंतर त्याला कसोटी पदार्पणाची संधी अखेरीस चालून आली. २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या नागपूर कसोटीत रोहित शर्मा कसोटीत पदार्पण करण्यासाठी सज्ज होता. या कसोटीपूर्वी व्हीव्हीएस लक्ष्मण दुखापतीतून न सावरल्याने त्यांच्या जागी रोहित शर्माची संघात निवड करण्यात आली.

हेही वाचा – Rohit Sharma: रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर कसोटी संघातून कायमची विश्रांती

नागपूर कसोटी सुरू होण्यापूर्वी संघ सराव करत होता. यादरम्यान फिल्डींगचा सराव करत असताना रोहित शर्माचा पाय मुरगळला. फुटबॉल खेळत असताना रोहितबरोबर अपघात झाला आणि त्याचा पाय मुरगळल्याने तो कसोटी सामन्यातून बाहेर झाला. रोहित शर्मा बाहेर झाल्याने वृद्धिमान साहाला अखेरच्या क्षणी त्याचा जागी विशेषज्ञ फलंदाज म्हणून बदली खेळाडू निवडण्यात आले. अशारितीने रोहित शर्माचं कसोटी पदार्पण लांबणीवर पडलं.

रोहित शर्माला ही दुखापत इतकी भारी पडली की त्याला कसोटी पदार्पण करण्यासाठी ३ वर्षे वाट पाहावी लागली. इतकंच नाही तर रोहितला त्यादरम्यान २०११ च्या वनडे विश्वचषक संघातूनही वगळण्यात आले. अखेरीस रोहित शर्माने सचिन तेंडुलकरच्या अखेरच्या कसोटी मालिकेत २०१३ मध्ये कसोटी पदार्पण केले. रोहित शर्माने २०१३ मध्ये वेस्ट इंडिजविरूद्ध ईडन गार्डन्सच्या मैदानावर अखेरीस कसोटी पदार्पण केले.

हेही वाचा – IND vs AUS: “रोहित शर्मा बाहेर बसणं आमच्यासाठी भावनिक…”, ऋषभ पंतचं सिडनी कसोटीदरम्यान भावुक करणारं वक्तव्य; पाहा VIDEO

सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीच्या कसोटी मालिकेत रोहित शर्माने पदार्पण करत उत्कृष्ट खेळी केली. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पदार्पणच्या सामन्यात रोहित शर्माने १७७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. ईडन गार्डन्सवर या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळवला गेला होता, या कसोटीत त्याने १७७ धावांची खेळी करत मोठा विक्रमही आपल्या नावे केला. भारताकडून कसोटीत पदार्पणात सर्वात मोठी खेळी करणारा रोहित शर्मा हा पहिला खेळाडू ठरला. भारताने यासह ही कसोटी एक डाव आणि ५१ धावांनी जिंकली.

हेही वाचा – IND vs AUS: बुमराहचा जळता कटाक्ष अन् भारताचं आक्रमक सेलिब्रेशन! कॉन्स्टासने वाद घातल्यानंतर ख्वाजाच्या विकेटचा VIDEO व्हायरल

तर मुंबईत झालेल्या कसोटीत भावुक करणार वातावरण होतं कारण सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीतील हा २०० वा आणि अखेरचा कसोटी सामना होता. सचिन तेंडुलकरने या सामन्यात ७४ धावा केल्या होत्या तर पदार्पणवीर रोहित शर्माने या सामन्यातही शतक झळकावले होते. रोहितने १११ धावांची नाबाद खेळी करत कसोटी कारकिर्दीला दणक्यात सुरूवात केली होती.

Story img Loader