Aakash Chopra On Team India Squad For Asia Cup 2023 : आशिया चषकासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा २१ ऑगस्टला करण्यात आली. परंतु, विकेटकिपर आणि फलंदाज संजू सॅमसनचा संघात समावेश केला नाहीय. संजूला बॅकअप कीपर म्हणून राखीव ठेवण्यात आलं आहे आणि तो मुख्य संघात सामील नाहीय. याबाबत टीम इंडियाचा माजी खेळाडू आकाश चोप्राने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, संजू सॅमसनचा नाव आशिया चषकाच्या संघात असायला पाहिजे होता.

वेस्टइंडिज दौऱ्यावर असताना संजू सॅमसनने चांगली कामगिरी केली नाही. एक-दोन इनिंग्स वगळता इतर सामन्यात संजूला धावांचा सूर गवसला नाही. संजूला जास्त संधी दिली जात नाही, असं त्याचे चाहते सोशल मीडियावर नेहमी म्हणतात. मात्र, वेस्ट इंडिज दौऱ्यावर असताना संजू सॅमसनला पूर्ण संधी मिळाली. परंत, त्याला संधीचं सोनं करता आलं नाही. कदाचित याच कारणामुळे त्याची आशिया चषकाच्या मुख्य संघात निवड केली नाही. तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादवला संघात सामील केलं आहे. मात्र, संजू सॅमसनला संघात जागा मिळाली नाही.

Uddhav Thackerays next challenge is not the third aghadi but the challenge of strike rate
उद्धव ठाकरेंपुढे तिसऱ्या आघाडीचं नव्हे, ‘स्ट्राइक रेट’चं आव्हान…
ankita walawalkar reveals marriage plans and talk about future husband
अंकिताचा ‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे? कोकणात करणार…
former cricketer Wasim Jaffer
रणजीपाठोपाठ इराणी जेतेपदाने मुंबईचे वर्चस्व अधोरेखित! १९९७च्या विजेत्या संघातील सदस्य वसिम जाफरचे मत
India vs Bangladesh 1st T20I
युवा खेळाडूंच्या कौशल्याचा कस; भारत-बांगलादेश पहिली ट्वेन्टी२० लढत आज
chess olympiad 2024 grandmaster abhijit kunte interview
आता तुल्यबळ खेळाडूंची फळी निर्माण करण्यावर भर – कुंटे
‘आयपीएल’ मध्ये सहा खेळाडूंना कायम ठेवण्यास मान्यता | Approval to retain six players in IPL sport news
‘आयपीएल’ मध्ये सहा खेळाडूंना कायम ठेवण्यास मान्यता
pakistan team hold indian flag
पाकिस्तानी संघाच्या हातात भारतीय राष्ट्रध्वज; व्हिडीओ व्हायरल होताच चर्चांना उधाण, कोणत्या स्पर्धेत घडली घटना?
Mohan Bhagwat JP Nadda
“भाजपाला पूर्वी RSS ची गरज होती, आता…”, नड्डांच्या वक्तव्यावर संघाची प्रतिक्रिया; म्हणाले, “कौटुंबिक वाद…”

नक्की वाचा – Asia Cup 2023: आशिया चषकात युजवेंद्र चहलला का दिला डच्चू? चहलची ट्वीटर पोस्ट झाली व्हायरल, म्हणाला…

संजू सॅमसनला नशिबाची साथ मिळाली नाही – आकाश चोप्रा

आकाश चोप्रा यांनी त्यांच्या यू-ट्यूब चॅनलवर प्रतिक्रिया देत म्हटलं, संजू सॅमसनला मुख्य संघात घेतलं नाही. कोणत्या खेळाडूच्या जागी संजूला सामील करता आलं असतं? तिलक वर्मा किंवा सूर्यकुमार यादवच्या जागेवर तो संघात येऊ शकला असता. संजू १७ सदस्यीय टीमचा भाग होऊ शकला असता. संजू सॅमसनचे चाहते आणि संजूला स्वत:ला अनलकी असल्यासारखं वाटत असेल. कारण त्याने वनडेत चांगली कामगिरी केली होती. वनडेत संजूची सरासरी ५० च्या पुढे आहे आणि वेस्टइंडिजमध्येही त्याने अर्धशतक ठोकलं होतं. तो एक चांगला खेळाडू आहे, यात कोणतीही शंका नाही. त्याच्याकडे अनुभव आहे.