आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी महेंद्रसिंग धोनीच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले असले तरी, या पार्श्वभूमीवर त्याच्या राजीनामाची शक्यता निर्माण होऊ शकत नसल्याचे स्पष्टीकरण बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांनी दिले.
धोनीला राजीनामा देण्यास मी का सांगू? असा सवाल उपस्थित करत सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने मी त्यावर काहीच बोलू शकत नाही, असे एन.श्रीनिवासन पत्रकारांशी बोलताना म्हणाले. तसेच इंडिया सिमेंट्स कंपनीतील महेंद्रसिंह धोनीच्या भूमिकेबद्दल बोलणे देखील श्रीनिवासन यांनी यावेळी टाळले.
एन. श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पनच्या आयपीएल स्पर्धेतील चेन्नई सुपर किंग्स संघातील भूमिकेसंदर्भात महेंद्रसिंग धोनीने मांडलेली भूमिका मुद्गल अहवालाशी विसंगत ठरल्याचे समोर आले होते. तसेच स्पॉट फिक्सिंग प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान इंडिया सिमेंट्स कंपनीचे उपाध्यक्ष पद भुषविणाऱया धोनीच्या भूमिकेबद्दल देखील सर्वोच्च न्यायालयाने विचारणा केली होती. त्यामुळे धोनीबद्दल उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

Story img Loader