Shreyas Iyer Statement Why He Parted Ways From KKR: श्रेयस अय्यर हा आयपीएल चॅम्पियन कर्णधार आहे. श्रेयसच्या नेतृत्त्वाखाली केकेआर संघाने आयपीएल २०२४ चे जेतेपद पटकावले. यानंतर पुढील सीझनसाठी म्हणजेच आयपीएल २०२५ साठी महालिलाव होणार होता. या लिलावापूर्वी सर्व संघांना आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करायची होती. पण केकेआर ही यादी जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला. केकेआरने संघाच्या चॅम्पियन कर्णधारालाच रिटेन केले नाही. पण आता श्रेयस अय्यरने केकेआरने रिटेन न केल्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

बॉलीवूड अभिनेता शाहरूख खानच्या मालकीचा आयपीएल संघ केकेआरने आयपीएल २०२५ च्या लिलावात श्रेयस अय्यरला मोठी बोली न लावता व्यंकटेश अय्यरसाठी तिजोरी रिती केली. यानंतर केकेआरने वेगळ्या अय्यरवर पैसा ओतला, याची जोरदार चर्चा होती. श्रेयस अय्यरने इंडियन एक्सप्रेसच्या आयडिया एक्सचेंजमध्ये केकेआरने रिलीज केल्याबाबत आणि मोठ्या आयपीएल किमतीबाबत वक्तव्य केले.

Why Rohit Sharma Will Visit Pakistan Ahead of ICC Champions Trophy 2025 According To Reports
Champions Trophy: रोहित शर्माला चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानला का जावं लागणार? का सुरू आहे चर्चा? वाचा कारण
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
IND vs IRE Smriti Mandhana and Pratika Rawal 233 run partnership broke a 20 year old record against Ireland
IND vs IRE : स्मृती-प्रतिकाच्या द्विशतकी भागीदारीने केला मोठा पराक्रम! मोडला २० वर्षांपूर्वीचा ‘हा’ खास विक्रम
Sanju Samson is unlikely to get a chance in the Indian team for Champions Trophy 2025 reports
Champions Trophy 2025 : ऋषभ पंत की संजू सॅमसन, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात कोणाला मिळणार संधी? घ्या जाणून
Rohit Sharma Practice With Mumbai Ranji Trophy Team at Wankhede Stadium
Rohit Sharma: रोहित शर्मा रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत, हिटमॅनने घेतला मोठा निर्णय; मुंबई संघासह…
Just tell Virat Kohli you have a match against Pakistan Shoaib Akhtar advice to India Champions Trophy vbm
Champions Trophy 2025 : ‘त्याला सांगा पाकिस्तानविरुद्ध मॅच आहे…’, विराटला फॉर्ममध्ये आणण्यासाठी शोएब अख्तरने भारताला दिला खास मंत्र
IPL 2025 Time Table
IPL 2025 : ठरलं! ‘या’ दिवसापासून रंगणार आयपीएलचा थरार, पहिला सामना ‘या’ तारखेला होणार
Devdutt Padikkal smashes hundred in quarterfinal against Baroda in Vijay Hazare Trophy 2025
Vijay Hazare Trophy : १५ चौकार अन् २ षटकार… देवदत्त पडिक्कलची शतकी खेळी बडोद्यावर पडली भारी

हेही वाचा – VIDEO: रोहित शर्माच्या कृतीने वानखेडेवर जिंकली सर्वांची मनं, चॅम्पियन्स ट्रॉफी करंडकाबरोबर फोटो काढताना पाहा काय घडलं?

आयडिया एक्सचेंजमध्ये श्रेयस अय्यरला प्रश्न विचारण्यात आला की, तू संघाचा यशस्वी कर्णधार असल्याने तुला केकेआर संघ रिटेन करेल, अशी खात्री होती. पण नेमकं काय घडलं?

या प्रश्नावर उत्तर देताना श्रेयस म्हणाला, निश्चितच, केकेआरसाठी चॅम्पियनशिप जिंकलो तो काळ खूपच विलक्षण होता. चाहत्यांचा पाठिंबा उत्कृष्ट होता, स्टेडियममध्ये चाहत्यांनी भरघोस प्रतिसाद दिला आणि मी तिथे घालवलेला प्रत्येक क्षण हा कमाल होता. त्यामुळे साहजिकच आयपीएल चॅम्पियनशिपनंतर आमची चर्चा झाली. परंतु काही महिने टाळाटाळ झाली आणि रिटेंशनची चर्चा करण्यासाठी त्यांच्याकडून फारसे प्रयत्न झाले नाहीत. नेमकं चाललंय काय याबाबत मी गोंधळून गेलो होतो. त्यामुळे संवादाच्या अभावामुळे, आम्ही अशा वळणावर आलो जिथे आम्ही एकमेकांपासून वेगळे झालो. यामागचं हेच साधं सोपं सत्य आहे.

हेही वाचा – Neeraj Chopra Wife: कोण आहे नीरज चोप्राची पत्नी? टेनिसपटू आणि आता आहे मॅनेजर; अमेरिकेत घेतेय शिक्षण

केकेआरसाठी खेळताना तू इतकं जीवन ओतून खेळलास आणि तरीही त्यांनी तुला रिटेन केलं हे पाहून तू निराश झालास का?

या प्रश्नाला उत्तर देताना श्रेयस अय्यर म्हणाला, हो साहजिकचं मी निराश झालो, कारण जेव्हा नीट संवाद साधला जात नाही आणि रिटेंशनच्या तारखेच्या एक आठवडाआधी जर चर्चा होत असेल तर साहजिकचं कुठेतरी पाणी मुरतंय. त्यामुळे मला ठाम निर्णय घ्यावा लागला. जे घडायचं आहे तर घडणारच आहे. पण याव्यतिरिक्त, मी केकेआरमध्ये शाहरूख सर, त्या संपूर्ण संघाबरोबर आणि एकंदरीत सर्वांबरोबरच जो वेळ घालवला तो खरंच कमाल होता आणि अर्थातच, चॅम्पियनशिप जिंकणे हा कदाचित माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता.

हेही वाचा – Neeraj Chopra Wedding: भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा अडकला विवाहबंधनात, फोटो केले शेअर; काय आहे पत्नीचं नाव?

श्रेयस अय्यरला आयपीएल २०२५ च्या लिलावात पंजाब किंग्स संघाने २६.७५ कोटींची विक्रमी बोली लावत संघात सहभागी केले. यानंतर आता पंजाब किंग्सने श्रेयस अय्यरला येत्या हंगामासाठी संघाचा कर्णधार म्हणूनही घोषित केलं. आता पंजाब किंग्सचा संघ पहिले विजेतेपद जिंकण्यासाठी श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखाली खेळताना दिसणार आहे.

Story img Loader