Shubman Gill Gold Coin: पुण्यातील MCA स्टेडियमवर टीम इंडियाच्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ च्या बांगलादेश विरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात भारताने आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. विराट कोहलीच्या दणदणीत शतकापासून ते के. एल. राहुलच्या निस्वार्थी खेळीपर्यंत, अंपायरने न दिलेल्या वाईड बॉलपर्यंत अनेक गोष्टी या सामन्यात चर्चेत आल्या. यातीलच एक बाब म्हणजे २४ वर्षीय स्टार फलंदाज शुबमन गिलने कॉलरवर लावलेलं सोन्याचं नाणं!

डेंग्यूवर नुकतीच मात करून संघात परतलेल्या गिलने रोहित शर्माच्यासह भागीदारी करून २५७ धावांचा पाठलाग केला. रोहित बाद होण्याआधी दोघांनी ८८ धावांची भागीदारी केली तर गिलने एकदिवसीय विश्वचषकात आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले. माघारी जाण्याआधी गिलने ५५ चेंडूत ५३ धावांची सुपर खेळी केली होती.

Jasprit Bumrah and Tabraiz Shamsi have similar T20I stats
Jasprit Bumrah : तबरेझ शम्सीच्या पोस्टने क्रिकेट विश्वाला दिला आश्चर्याचा धक्का! जसप्रीत बुमराहबरोबर घडला असा योगायोग की विश्वासच बसणार नाही
Amit Shah and Vinod Tawde meeting
Vinod Tawde Meeting with Amit Shah: “मराठा मुख्यमंत्री…
IND vs AUS virat Kohli Is Emotional Said Glenn MacGrath Urges Australia to Go Hard on Him in Border Gavaskar Trophy
IND vs AUS: “विराट कोहली भावनिक आहे, त्याचा फायदा…”, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूने कांगारू संघाला दिला मोलाचा सल्ला
IND vs AUS Sourav Ganguly Says Rohit Sharma should be playing the Perth Test
IND vs AUS : ‘… तर रोहित पुन्हा कधीही ऑस्ट्रेलियाला जाणार नाही’, सौरव गांगुलीचे हिटमॅनबद्दल मोठं वक्तव्य
Tilak Verma scores centuries in two consecutive T20 matches in South Africa
Tilak Varma : ‘…मी कल्पनाही केली नव्हती’, विक्रमी शतकानंतर तिलक वर्माने देवासह ‘या’ खेळाडूचे मानले आभार
India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
KL Rahul Injured in Intra Squad Match Simulation Session Perth Walks Off Field for Scanning Ahead Border Gavaskar Trophy IND vs AUS
IND vs AUS: भारताला पर्थ कसोटीपूर्वी मोठा धक्का, केएल राहुलला सराव सामन्यात दुखापत, सोडावं लागलं मैदान!

शुबमन गिलच्या कॉलरवर चमकणाऱ्या नाण्याची गोष्ट

या खेळादरम्यान मैदानावरील गिलच्या चमकदार कामगिरीने चाहत्यांना आणि प्रेक्षकांना भुरळ घातली. पण त्याहीपेक्षा अनेकांना गिलच्या कॉलरवर चमचमणाऱ्या एका लहान पिनसारख्या वस्तूविषयी कुतूहल वाटत होते. गिलच्या कॉलरला लावलेलं सोन्याचं नाणं हे खरोखरच एका खास निशाणी आहे.
सप्टेंबरमध्ये ICC प्लेयर ऑफ द मंथ म्हणून त्याला हे नाणं प्रसन्न करण्यात आलं होतं. टीम इंडियाच्या विजयी आशिया चषक मोहिमेदरम्यान आणि त्यानंतरच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान गिलच्या असामान्य योगदानाबद्दल त्याला हे नाणं देऊन गौरवण्यात आलं होतं.

हे ही वाचा<< IND vs PAK: पाकिस्तानच्या हरण्याचं कारण वासिम अक्रमनं केलं उघड! म्हणाला, “महिन्यातून एकदा..”

सप्टेंबर महिन्यात जेव्हा आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार मिळाला तेव्हा तो स्वीकारताना गिलने आनंद व्यक्त केला होता. “आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणे आणि संघाच्या विजयासाठी योगदान देणं ही संधी खूप मोठी आहे आणि त्यात मला मिळालेला हा पुरस्कार आणखीनच प्रोत्साहित करणारा आहे, मी असं काम करेन ज्याने संपूर्ण देशाला माझा अभिमान वाटेल, “असे गिल म्हणाला होता.