Team India Wearing Black Arm Bands in IND vs AUS: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज ४ मार्चला भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळण्यासाठी उतरला आहे. हा सामना दुबईच्या मैदानावर होत असून विजयी होणारा संघ अंतिम फेरीत पोहोचणार आहे. ऑस्ट्रेलियाने या सामन्याची नाणेफेक जिंकली असून कांगारू संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरणार आहे. तर टीम इंडिया गोलंदाजी करताना दिसेल. दरम्यान भारतीय संघ या सामन्यात हातावर काळी पट्टी बांधून उतरला आहे, काय आहे यामागचे कारण? जाणून घेऊया.
भारताचे देशांतर्गत क्रिकेटमधील मोठं नाव असलेले फिरकीपटू पद्माकर शिवलकर यांचे निधन झाले. यामुळे पद्माकर शिवलकर यांना श्रध्दांजली म्हणून भारतीय संघ हातावर काळी पट्टी बांधून उतरला आहे.
भारतातील सर्वोत्तम डावखुऱ्या फिरकीपटूंपैकी एक पद्माकर शिवलकर यांचे सोमवारी मुंबईत निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते आणि गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. शिवलकर यांनी देशाच्या राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी मिळाली नाही. निवृत्ती घेतल्यानंतर शिवलकर यांनी मुंबई रणजी ट्रॉफी संघाचे प्रशिक्षक म्हणून देखील काम केले. १९६० आणि ७०च्या दशकात जेव्हा मुंबईचा देशांतर्गत क्रिकेटमध्ये दबदबा होता तेव्हा शिवलकर यांचे नाव मोठे होते. २०१७ मध्ये शिवलकर यांना बीसीसीआय सीके नायूडू जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
In honour of the late Shri Padmakar Shivalkar, Team India is wearing black armbands today.
— BCCI (@BCCI) March 4, 2025
शिवलकर यांना भारताच्या राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी मिळाली नाही. पण निवृत्ती घेतल्यानंतर शिवलकर यांनी मुंबई रणजी ट्रॉफी संघाचे प्रशिक्षक म्हणून देखील काम केले. खेळातून निवृत्ती घेतल्यानंतर शिवलकर यांनी मुंबईतील शिवाजी पार्क येथे प्रशिक्षक म्हणून काम सुरू केले. येथे त्यांनी अनेक प्रतिभावान खेळाडूंना घडवले. जसे की हरमीत सिंग जो अंडर १९ आणि मुंबईसाठी खेळला आणि पुढे यूएसए संघात सहभागी झाला.
भारताची सेमीफायनलसाठी प्लेईंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव.
ऑस्ट्रेलियाची सेमीफायनलसाठी प्लेईंग इलेव्हन
कूपर कॉनोली, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लबुशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), ॲलेक्स कॅरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन ड्वार्शुइस, नॅथन एलिस, ॲडम झाम्पा, तन्वीर संघाEditDelete