गो हाथ को जुम्बिश नहीं आँखो में तो दम है

रहने दो अभी सागरो-मीना मेरे आगे

Jasprit Bumrah and Tabraiz Shamsi have similar T20I stats
Jasprit Bumrah : तबरेझ शम्सीच्या पोस्टने क्रिकेट विश्वाला दिला आश्चर्याचा धक्का! जसप्रीत बुमराहबरोबर घडला असा योगायोग की विश्वासच बसणार नाही
Shivsena Eknath Shinde Rebel Winner Candidates List in Marathi
Shivsena Eknath Shinde Rebel Candidates Result : एकनाथ…
Tilak Verma scores centuries in two consecutive T20 matches in South Africa
Tilak Varma : ‘…मी कल्पनाही केली नव्हती’, विक्रमी शतकानंतर तिलक वर्माने देवासह ‘या’ खेळाडूचे मानले आभार
Arshdeep Singh Becomes India Most Successful T20I Fast Bowler Surpasses Jasprit Bumrah and Bhuvneshwar Kumar with 92 Wickets IND vs SA
IND vs SA: अर्शदीप सिंगने बुमराह-भुवनेश्वरला मागे टाकत घडवला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला भारताचा पहिला वेगवान गोलंदाज
Tilak Varma Statement on Maiden T20I Century Flying Kiss Celebration He Said It is For Suryakumar Yadav Gives credit to him IND vs SA
IND vs SA: तिलक वर्माने शतकानंतर कोणाला फ्लाईंग किस दिला? सामन्यानंतर स्वत:च सांगितलं…
Tilak Verma becomes 2nd youngest player to score a T20I century for India
Tilak Verma : तिलक वर्माने वादळी शतक झळकावत घडवला इतिहास, भारतासाठी ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
Arjun Tendulkar Maiden Five Wicket Haul in First Class Cricket Ranji Trophy Goa vs Arunachal Pradesh
Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने पहिल्यांदाच पटकावल्या ५ विकेट्स; रणजी करंडक स्पर्धेत भेदक गोलंदाजी; ८४ धावांवर संघ सर्वबाद

उन के देखे से जो आ जाती है मुंह पर रौनक

वो समझते हैं की बीमार का हाल अच्छा है..

गालीब यांच्या या ओळी बिशन सिंग बेदी यांना अगदी तंतोतंत लागू पडतात. बिशन सिंग बेदी यांचं निधन झालं आहे. मात्र त्यांची कारकीर्द आपल्या स्मरणात राहील अशीच आहे. २५ सप्टेंबर १९४६ या दिवशी पंजाबच्या अमृतसर शहरात बिशन सिंग बेदी यांचा जन्म झाला. ६७ सामन्यांमध्ये २६६ बळी घेण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कप्तान बिशन सिंग यांची प्राणज्योत मालवली.

एक काळ असा होता की आपल्या गोलंदाजीने बिशन सिंग बेदी यांनी जगातल्या भल्या भल्या फलंदाजांच्या तोंडचं पाणी पळवलं होतं. त्यांच्या वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांच्यावर लिहिण्यात आलेल्या बिशन सिंग बेदी द सरदार ऑफ स्पिन या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं तेव्हा त्यांना व्हिलचेअरवर पाहून अनेकांना वाईट वाटलं होतं. मात्र टाळ्यांचा गजर करत त्यांचं स्वागत त्या कार्यक्रमात करण्यात आलं होतं.

बिशन सिंग बेदी यांच्या आठवणी सांगत आकाश लाल म्हणाले..

१९६९ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचा सामना दिल्लीच्या फिरोज शाह कोटला मैदानात होता. हा तिसरा कसोटी सामना होता. त्यावेळी बिशन सिंग बेदी यांनी डग वॉल्टर्सची जी विकेट काढली ती अजूनही माझ्या स्मरणात आहे असं आकाश लाल म्हणाले. डग वॉल्टर्स क्रीझवरर होता. बेदी यांच्या गोलंदाजीचे चार चेंडू तो थोडं सावधगिरीने खेळत होता. पुढचा चेंडू टाकण्यासाठी बेदी क्रीझच्या कोपऱ्यावर आले तेव्हा त्यांच्या तोंडून निघून गेलं आता वॉल्टर्स गेला. तो चेंडूही फास्ट आर्म होता. वॉल्टर्स त्या चेंडूवर स्क्वेअर कट मारायला गेला पण त्या गडबडीत तो क्लिन बोल्ड झाला.

अंशुमन गायकवाड यांनी सांगितलेला तो किस्सा

याच कार्यक्रमात बिशन सिंग बेदी यांच्याविषयीचा एक किस्सा अंशुमन गायकवाड यांनीही सांगितला. मी कधीही बेदी यांच्यासारखा कॅप्टन पाहिला नाही. ते आधी टीमचा विचार करायचे आणि मग आपला. १९७५-७६ च्या वेस्ट इंडिज दौऱ्याच्या वेळी एकापाठोपाठ एक भारतीय खेळाडू रक्तबंबाळ झाले होते. त्यावेळी दुसरी इनिंग पाच विकेट आणि ९७ धावांवर बिशन सिंग बेदींनी घोषित केली. त्यावेळी भारताचा पराभव झाला. त्यावेळी मलाही दुखापत झाली होती त्यामुळे बॅटिंगला मी उतरु शकलो नव्हतो. त्यावेळी कॅप्टन म्हणून योग्य निर्णय घेणं आवश्यक होतं जो बिशन सिंग बेदींनी घेतला.

बिशन सिंग बेदींविषयी गावसकर आणि कपिल देव काय म्हणाले होते?

वसीम अक्रमचा उदय व्हायचा होता, मात्र बिशन सिंग बेदी हे सर्वश्रेष्ठ गोलंदाज होते. त्यांच्याबरोबर खेळायला मिळणं हे मी माझं भाग्य समजतो. त्यांची गोलंदाजी नितांत सुंदर होती असं गावसकर यांनी म्हटलं होतं. तर कपिल देव म्हणाले सुरुवातीच्या दिवसांमध्ये बिशन सिंग बेदी कडक कॉलरचा शर्ट आणि काही बटणं उघडी अशा अंदाजात गोलंदाजी करताना दिसायचे. ते माझे पहिले कॅप्टन होते. तसंच नंतर ते आमचे मॅनेजरही होते. १९९० चा न्यूझीलँड आणि इंग्लंडचा दौरा आम्ही त्यांच्यासह केला असंही देव यांनी म्हटलं आहे. विकेट घेण्यासाठी कुठलाही गोलंदाज चुकीच्या पद्धती वापरत असेल तर ते बेदी यांना मुळीच आवडायचं नाही. ते तातडीने त्याविरोधात आवाज उठवायचे.

बिशन सिंग बेदी या गोलंदाजाने आता जगाचा निरोप घेतला आहे. मात्र त्यांना सरदार ऑफ स्पिन का म्हणायचे? हे त्यांच्याविषयीचे हे किस्सेच सांगून जातात.