आशिया चषक २०२३ साठी भारताच्या १७ सदस्यीय संघाची घोषणा २१ ऑगस्टला करण्यात आली. बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा यांच्या उपस्थित टीम इंडियाचा स्क्वॉड निश्चित करण्यात आला. त्यानंतर दोघांनी पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. विशेष म्हणजे, युजवेंद्र चहलची आशिया चषकासाठी निवड न झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. टीम इंडियासाठी रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि अक्षर पटेलला तिसरा स्पिनर म्हणून संघात स्थान देण्यात आले. अशातच आता टीम इंडियामध्ये डच्चू दिल्यानंतर खुद्द युजवेंद्र चहलने याबाबत ट्वीटरवर प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

युजवेंद्र चहलने ट्वीटरवर एक इमोजी शेअर करून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या ट्वीटमध्ये असं दिसतंय की, एका बाजूला सूर्य ढगांच्या आड लपलेला दिसत आहे. तर दुसरीकडे बाण दाखवून सूर्य चमकत असल्याचं दृष्य दाखवण्यात आलं आहे. यावरुन असा संदेश दिला जात आहे की, चहल पुन्हा चमकदार कामगिरी करून लवकरच यशस्वी होईल.

आशिया चषकासाठी चहलची निवड का करण्यात आली नाही, असं कर्णधार रोहित शर्माला जेव्हा विचारण्यात आलं, त्यावेळी त्याने म्हटलं, अश्विन-चहल आणि वॉश्गिंटन सुंदर सर्वच वर्ल्डकपच्या प्लॅनमध्ये समाविष्ट आहेत. त्यांचे संघात सामील होण्याचे दरवाजे बंद झालेले नाहीत. आम्हाला असा निर्णय यासाठी घ्यावा लागला की, आम्ही फक्त १७ खेळाडूंनाच संघात सामील करू शकतो. अक्षर पटेल आम्हाला फलंदाजीचाही विकल्प देतो आणि यावर्षी त्याने खूप चांगली कामगिरी केली आहे.

यावर्षी चहलला फक्त दोन वनडे खेळण्याची मिळाली संधी

२०२३ मध्ये युजवेंद्र चहलला फक्त २ वनडे सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. एक सामना श्रीलंकेविरुद्ध आणि दुसरा न्यूझीलंड विरोधात घरेलू मैदानावर खेळला. चहलला २०२२ मध्ये एकूण १४ वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली होती. याचदरम्यान त्याने २७.१० च्या सरासरीनं २१ विकेट्स घेण्याची कामगिरी केली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why yuzvendra chahal has not been selected in team india for asia cup 2023 chahals twitter post viral nss
Show comments