WI vs BAN Bangladesh historic Test victory in West Indies after 15 years : वेस्ट इंडिज संघाने घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेची सुरुवात अतिशय चांगल्या पद्धतीने केली होती, ज्यामध्ये त्यांनी पहिला सामना २०१ धावांनी जिंकला होता. जमैकाच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात बांगलादेश संघाने मोठा उलटफेर केला आणि १०१ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरीत राखली. बांगलादेशचा कॅरेबियन बेटांवरचा तिसरा विजय आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१५ वर्षांनंतर बांगलादेशचा वेस्ट इंडिजमध्ये कसोटी विजय –

या सामन्यात बांगलादेशने वेस्ट इंडिज संघासमोर २८७ धावांचे लक्ष्य होते, परंतु त्यांना केवळ १८५ धावाच करता आल्या. डावखुरा फिरकीपटू तैजुल इस्लामने बांगलादेश संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली, ज्याने सामन्याच्या शेवटच्या डावात १७ षटकांत ५० धावा देत विंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवला. जमैका येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यापूर्वी, बांगलादेश संघाने २००९ मध्ये त्यांच्या घरच्या मैदानावर कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा शेवटचा पराभव केला होता. ग्रेनेडाच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात बांगलादेश संघाने ४ गडी राखून विजय मिळवला होता. आता १५ वर्षांनंतर वेस्ट इंडिजला त्यांच्याच घरच्या मैदानावर कसोटी सामन्यात पराभूत करण्यात त्यांना यश आले आहे.

या सामन्यात बांगलादेश संघ प्रथम फलंदाजी करताना केवळ १६४ धावांत गारद झाला होता, त्यानंतर त्यांच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत वेस्ट इंडिजचा पहिला डाव केवळ १४६ धावांत गुंडाळला. बांगलादेशने दुसऱ्या डावात २६८ धावा केल्या, ज्यात झाकेर अलीची ९१ धावांची उत्कृष्ट खेळी पाहायला मिळाली. या सामन्यातील वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावाबद्दल बोलायचे झाले तर केवळ केव्हम हॉजलाच अर्धशतक करता आले.

हेही वाचा – ZIM vs PAK : २५ वर्षीय सुफियान मुकीमची कमाल! सातव्या सामन्यातच मोडला पाकिस्तानचा सर्वात मोठा विक्रम

बांगलादेशने यावर्षी घराबाहेर तिसरी कसोटी जिंकली –

२०२४ हे वर्ष बांगलादेश संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये फारसे खास नसले तरी घराबाहेरील त्यांचा हा तिसरा कसोटी विजय निश्चितच आहे. आतापर्यंत, बांगलादेश संघाने कोणत्याही कॅलेंडर वर्षात घराबाहेर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवले आहेत. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या हंगामातील बांगलादेशची ही शेवटची कसोटी मालिका असताना, वेस्ट इंडिजला अजून एक मालिका खेळायची आहे जी पुढील वर्षी पाकिस्तान खेळली जाणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wi vs ban 2nd test bangladesh beat west indies in test cricket on home soil after 15 years vbm