West Indies vs England T20 series: २४ वर्षीय इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूकने शनिवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिस-या सामन्यात क्वचितच कोणी कल्पना केली असेल, अशी आश्चर्यकारक कामगिरी केली. टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील या सामन्याचा शेवट सर्वात नाट्यमय झाला. या टी-२० मध्ये इंग्लंडला विजयासाठी शेवटच्या ६ चेंडूत २१ धावांची गरज होती आणि ब्रुकने तुफानी फलंदाजी करत इंग्लंडला रोमांचक विजय मिळवून दिला आणि मालिकेत पुनरागमन केले. डेथ ओव्हर्समध्ये घातक गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या आंद्रे रसेलच्या चेंडूवर त्याने शानदार फटकेबाजी केली. ब्रुकने अवघ्या पाच चेंडूत हा सामना संपवला. वेस्ट इंडिजचा संघ मालिकेत अजूनही २-१ने आघाडीवर आहे. चौथा टी-२० सामना १९ डिसेंबरला त्रिनिदादमध्ये खेळवला जाईल.

ग्रेनाडा येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ गडी गमावून २२२ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने १९ षटकांत तीन गडी गमावून २०२ धावा केल्या होत्या. हॅरी ब्रूक आणि फिलिप सॉल्ट खेळपट्टीवर होते. ब्रुक स्ट्राईकवर असताना रसेल शेवटचे षटक टाकायला आला. पहिल्या चेंडूवर रसेलने यॉर्करचा प्रयत्न केला, पण तो हुकला. पायाच्या खालच्या भागाजवळ पडलेल्या चेंडूवर चौकार मारून ब्रूकने षटकाची चांगली सुरुवात केली. यानंतर दुसऱ्या चेंडूवर ब्रूकने कव्हरच्या दिशेने षटकार ठोकला. ब्रूकने दोन चेंडूत १० धावा काढल्याने इंग्लंडचा आत्मविश्वास उंचावला.

Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी
Ranji Trophy Mumbai Crush Odisha By An Innings & 103 Runs
Ranji Trophy : शम्स मुलानीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने ओडिशाचा उडवला धुव्वा! एक डाव आणि १०३ धावांनी चारली धूळ
Australia A beat India A by 6 Wickets in in 2nd unofficial Test
IND A vs AUS A : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी भारताची उडाली दाणादाण, दुसऱ्या सराव सामन्यातही हार
Sanju Samson breaks Dhoni record to become joint 7th Indian batter
Sanju Samson : संजू सॅमसनने धोनीला मागे टाकत केला खास पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला सातवा भारतीय
IND vs SA India National Anthem Witnesses Technical Glitch Ahead Of 1st T20I vs South Africa
IND vs SA सामन्यापूर्वी अचानक काही सेकंदात बंद झाले भारताचे राष्ट्रगीत, मग पुढे काय झालं? जाणून घ्या

तिसऱ्या चेंडूवर रसेलने पुन्हा यॉर्करचा प्रयत्न केला, पण तो हुकला आणि त्याचा फुल टॉस झाला. रसेलच्या फुल टॉसवर इंग्लंडच्या ब्रूकने चेंडू लेग बाऊंड्री पार नेत षटकार ठोकला. इंग्लंडला विजयासाठी शेवटच्या ३ चेंडूत ५ धावांची गरज होती. या सामन्यात एकेकाळी इंग्लिश संघाला २४ चेंडूत ७१ धावा करायच्या होत्या, त्या स्थितीतून आता ३ चेंडूत ६ धावा असे समीकरण झाले होते. चौथ्या चेंडूवर ब्रूकने शॉर्ट पिच चेंडूला सीमारेषेवर पाठवण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी चौकार जावू शकला नाही आणि केवळ दोन धावाच करू शकला.

यानंतर, पाचव्या चेंडूवर, रसेलने फुलर लेन्थचा चेंडू बाहेर टाकला, ज्यावर ब्रूकने थर्ड मॅनवर षटकार ठोकला आणि संघाला विजय ऐतिहासिक मिळवून दिला. वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० मधील इंग्लंडचे हे सर्वात मोठे आव्हान होते. रसेलला २१ धावा वाचवण्यात यश आले नाही. या मालिकेतूनच रसेलचे दोन वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय संघात पुनरागमन झाले आहे. सात चेंडूंत एक चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ३१ धावा केल्यानंतर ब्रूक नाबाद राहिला. दुसरीकडे, सॉल्टने ५६ चेंडूंत चार चौकार आणि नऊ षटकारांच्या मदतीने नाबाद १०९ धावांची शतकी खेळी केली. कर्णधार जोस बटलरने ३४ चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ५१ धावा केल्या. लियाम लिव्हिंगस्टोन १८ चेंडूत ३० धावा करून बाद झाला.

हेही वाचा: IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वन डेत संजू सॅमसनला संधी मिळणार का? टीम इंडिया करणार नवी सुरुवात

वेस्ट इंडिजचा डाव

तत्पूर्वी, विंडीजने निकोलस पूरनने ४५ चेंडूंत सहा चौकार आणि तब्बल षटकारांच्या जोरावर केलेल्या ८२ धावांच्या जोरावर २२२ धावा केल्या होत्या. याशिवाय कर्णधार रोव्हमन पॉवेलने २१ चेंडूत ३९ आणि शाई होपने १९ चेंडूत २६ धावा केल्या. शेरफेन रदरफोर्डने १७ चेंडूत २९ आणि जेसन होल्डरने ५ चेंडूत १८ धावा केल्या. या मालिकेतील चौथा सामना इंग्लंडने जिंकल्यास मालिकेत २-२ अशी बरोबरी होऊ शकते आणि अंतिम सामन्यात या मालिकेचा निर्णय लागू शकतो.