India vs West Indies 2nd T20: वेस्ट इंडिजविरुद्धच्या सलग दुसऱ्या टी२० सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. त्रिनिदादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी२०मध्ये विंडीजने चार धावांनी आणि गयानामध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी२०मध्ये दोन गडी राखून विजय मिळवला. या पराभवानंतर टीम इंडियाच्या तयारीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. खरे तर २०२४ मध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेमध्ये टी२० विश्वचषक खेळवला जाणार असून त्यांना त्यांना त्याचे यजमानपद मिळाले आहे. त्या वर्ल्डकपसाठी या मालिकेकडे टीम इंडियाची तयारी म्हणून पाहिले जात होते. पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने फलंदाजांवर जोरदार टीका केली. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दुसऱ्या टी२० नंतर कर्णधार हार्दिक संतापला. तो म्हणाला, “प्रामाणिकपणे सांगायचे तर आमची फलंदाजी चांगली नव्हती. आम्ही आणखी चांगली फलंदाजी करू शकलो असतो. १६०+ किंवा १७० धावा या त्या खेळपट्टीवर खूप महत्त्वाच्या होत्या. वेस्ट इंडिजचे फलंदाज ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहेत, त्यामुळे फिरकीपटूंना गोलंदाजी करणे खूप कठीण होऊन बसले. निकोलस पूरनने ज्या प्रकारे फलंदाजी केली, त्यामुळे वेस्ट इंडिजच्या बाजूने सामना फिरला. मात्र, तो बाद होताच युजी आणि बिश्नोईने भारताला सामन्यात परत आणले पण शेवटच्या जोडीने विंडीजला विजय मिळवून दिला. जर याच ठिकाणी १७० धावसंख्या असती तर आम्ही कदाचित सामना जिंकला असता.”

भारताचा कर्णधार हार्दिक पुढे म्हणाला, “सध्याच्या टीम कॉम्बिनेशनमध्ये पहिल्या सात फलंदाजांवर मोठी धावसंख्या उभी करण्याची जबाबदारी आहे आणि ते तसे करतील असा विश्वास ठेवायला हवा. मात्र, फलंदाजांनी देखील संधीचा फायदा उठवणे गरजेचे आहे. तसेच, गोलंदाज तुम्हाला सामने जिंकून देतील अशी तुमची अपेक्षा आहे पण त्यासाठी त्यांना धावा देणे गरजेचे आहे. आमच्याकडे योग्य संघ संतुलन आहे याची खात्री करण्यासाठी आम्हाला मार्ग शोधावे लागतील, परंतु त्याच वेळी फलंदाजांनी अधिक जबाबदारी घेणे आवश्यक आहे.”

हेही वाचा: ICC WC 2023: संघ जाहीर करण्यात ऑस्ट्रेलियाने घेतली आघाडी; विश्वचषकासाठी केला संघ जाहीर, कमिन्स-हेझलवुडचे पुनरागमन

हार्दिकने तिलक वर्मा यांचे कौतुक केले. तो म्हणाला, “डावखुरा फलंदाज चौथ्या क्रमांकावर येण्याने संघाला विविधता मिळते. हा त्याचा दुसरा आंतरराष्ट्रीय सामना होता असे वाटत नाही. फलंदाजांनी जर खेळपट्टीचा अंदाज घेऊन जर फलंदाजांनी फलंदाजी केली असती तर आज ही वेळ आली नसती.” दुसऱ्या टी२० मध्ये प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २० षटकात ७ गडी गमावून १५२ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिज संघाने १८.५ षटकांत आठ गडी गमावून १५५ धावा केल्या. मालिकेतील तिसरा टी२० सामना ८ ऑगस्ट रोजी प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळवला जाईल.

चहलला १८वे षटक देण्यात आले नाही

भारतीय संघासाठी लेगस्पिनर युजवेंद्र चहलने १६व्या षटकात दोन धावा देत दोन फलंदाजांना बाद केले. यात शिमरॉन हेटमायर आणि अष्टपैलू जेसन होल्डर यांच्या विकेट्सचा समावेश होता, जे खेळपट्टीवर सेट होते. या षटकात रोमारियो शेफर्ड धावबाद झाला. चहलचा चेंडूही वळत होता. त्याचा अजून एक स्पेल बाकी होता आणि वेस्ट इंडिजचे खालच्या फळीतील फलंदाज क्रीजवर होते. यानंतरही हार्दिक पांड्याने त्याला १८व्या षटकात गोलंदाजी दिली नाही. त्यामुळे त्याच्या कॅप्टन्सीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

हेही वाचा: Mohammad Haris: “भारताला आम्ही लहान पोरांना पाठवा असं…” पाकिस्तानी खेळाडू मोहम्मद हारिसची BCCIवर टीका

सामन्यात काय घडले?

पुन्हा एकदा फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारताला सलग दुसऱ्या टी२० क्रिकेट सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. प्रथम फलंदाजी करताना भारताने टिळक वर्माच्या पहिल्या अर्धशतकाच्या जोरावर सात विकेट्सवर १५२ धावा केल्या. प्रत्युत्तरात निकोलस पूरनने ४० चेंडूत ६७ धावा करत संघाच्या विजयाचा पाया रचला. वेस्ट इंडिजने हे लक्ष्य १८.५ षटकांत आठ गडी गमावून पूर्ण केले.