WI vs NZ Chinelle Henry leaves the field after getting hit on her face : महिला टी-२० विश्वचषक २०२४ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने वेस्ट इंडिजचा पराभव केला. रोमहर्षक सामन्यात वेस्ट इंडिजला ८ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. या विजयानंतर न्यूझीलंडचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ अंतिम फेरीत न्यूझीलंडशी भिडणार आहे. या सामन्यादरम्यान एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. वेस्ट इंडिजची खेळाडू चिनेल हेन्री झेल पकड असताना वेगवान चेंडू तिच्या चेहऱ्यावर आदळला, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

चिनेल हेन्रीच्या चेहऱ्यावर आदळला चेंडू –

११व्या षटकापर्यंत संघाने १ गडी गमावून ६३ धावा केल्या होत्या. जॉर्जिया प्लिमर ३२ आणि अमेलिया केर ५ धावा करून खेळत होती. यानंतर १२व्या षटकात डिआंड्रा डॉटिन गोलंदाजीसाठी आली. डॉटिनने पहिलाच चेंडू शॉर्ट लेन्थ टाकला, ज्यावर अमेलिया केरने एक शक्तिशाली शॉट खेळला जो हवेत लाँग-ऑनच्या दिशेने गेला. तिथे उभी असलेली चिनेल हेन्री झेल पकडण्यासाठी गेली, पण अंदाज न आल्याने चेंडू तिच्या चेहऱ्यावर आदळला. ज्यामुळे हेन्री तिथेच जमिनीवर कोसळली. यानंतर मैदानावर शांतता पसरली आणि सर्व खेळाडू हेन्रीकडे धावले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

PV Sindhu enters the second round of the Denmark Open Badminton Tournament sports news
सिंधूचा दुसऱ्या फेरीत प्रवेश
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
MS Dhoni new look photo viral
MS Dhoni : ‘तपकिरी केस, हिरवा चष्मा आणि हलकी दाढी’, माहीच्या नव्या लूकने चाहत्यांना लावले वेड, फोटो व्हायरल
Hardik Pandya No look shot video viral during India vs Bangladesh 1st T20 Match
Hardik Pandya : हार्दिक पंड्याच्या No Look शॉटने चाहत्यांना लावलं वेड, VIDEO होतोय तुफान व्हायरल
‘आयपीएल’ मध्ये सहा खेळाडूंना कायम ठेवण्यास मान्यता | Approval to retain six players in IPL sport news
‘आयपीएल’ मध्ये सहा खेळाडूंना कायम ठेवण्यास मान्यता
ENG vs AUS Liam Livingstone smashed 28 runs in a over of Mitchell Starc video viral
IPL मध्ये एका हंगामात २४ कोटी कमावणाऱ्या मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीच्या ठिकऱ्या; लिव्हिंगस्टोनने ६ चेंडूत चोपल्या २८ धावा
India vs Bangladesh 2nd Test from today sport news
वर्चस्व राखण्याचे भारताचे लक्ष्य! बांगलादेशविरुद्ध दुसरी कसोटी आजपासून; सलग १८व्या मालिका विजयासाठी प्रयत्नशील
India grandmaster chess player D Gukesh expressed that he did not even think about it during the chess Olympiad sport news
ऑलिम्पियाड स्पर्धेदरम्यान जगज्जेतेपदाच्या लढतीचा विचारही नाही -गुकेश

ज्या वेगाने चेंडू चिनेल हेन्रीला लागला ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. मैदानात उपस्थित खेळाडूंपासून ते स्टेडियममध्ये सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांपर्यंत सर्वांचा श्वास क्षणभर थांबला. यानंतर काही वेळातच फिजिओ मैदानात आले आणि त्यांनी चिनेल हेन्रीच्या प्रकृतीचा आढावा घेतला. चांगली गोष्ट म्हणजे फिजिओ आल्यानंतर चिनेल तिच्या पायावर उभी राहण्यात यशस्वी झाली. यानंतर तिला दोन खेळाडूंच्या मदतीने मैदानाबाहेर वैद्यकीय उपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर थोड्या विश्रांतीनंतर सामना पुन्हा सुरू झाला.

हेही वाचा – IND vs NZ : भारत-न्यूझीलंडने बंगळुरू कसोटीत केला मोठा पराक्रम, भारतात पहिल्यांदाच ‘या’ खास विक्रमाची झाली नोंद

न्यूझीलंडने फायनलमध्ये मारली धडक –

दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, या सामन्यात न्यूझीलंडच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ गडी गमावून केवळ १२८ धावा केल्या. वेस्ट इंडिजचा फॉर्म आणि त्यांची फलंदाजी पाहता या सामन्यात त्यांचा संघ १२९ धावांचे लक्ष्य सहज गाठेल असे वाटत होते, परंतु त्यांचा संघ २० षटकात ८ गडी गमावून केवळ १२० धावा करू शकला आणि न्यूझीलंड संघाने विजय मिळवत फायनलमध्ये धडक मारली