WI vs NZ Chinelle Henry leaves the field after getting hit on her face : महिला टी-२० विश्वचषक २०२४ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने वेस्ट इंडिजचा पराभव केला. रोमहर्षक सामन्यात वेस्ट इंडिजला ८ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. या विजयानंतर न्यूझीलंडचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ अंतिम फेरीत न्यूझीलंडशी भिडणार आहे. या सामन्यादरम्यान एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. वेस्ट इंडिजची खेळाडू चिनेल हेन्री झेल घेताना वेगवान चेंडू तिच्या चेहऱ्यावर आदळला, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चिनेल हेन्रीच्या चेहऱ्यावर आदळला चेंडू –

११व्या षटकापर्यंत संघाने १ गडी गमावून ६३ धावा केल्या होत्या. जॉर्जिया प्लिमर ३२ आणि अमेलिया केर ५ धावा करून खेळत होती. यानंतर १२व्या षटकात डिआंड्रा डॉटिन गोलंदाजीसाठी आली. डॉटिनने पहिलाच चेंडू शॉर्ट लेन्थ टाकला, ज्यावर अमेलिया केरने एक शक्तिशाली शॉट खेळला जो हवेत लाँग-ऑनच्या दिशेने गेला. तिथे उभी असलेली चिनेल हेन्री झेल पकडण्यासाठी गेली, पण अंदाज न आल्याने चेंडू तिच्या चेहऱ्यावर आदळला. ज्यामुळे हेन्री तिथेच जमिनीवर कोसळली. यानंतर मैदानावर शांतता पसरली आणि सर्व खेळाडू हेन्रीकडे धावले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ज्या वेगाने चेंडू चिनेल हेन्रीला लागला ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. मैदानात उपस्थित खेळाडूंपासून ते स्टेडियममध्ये सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांपर्यंत सर्वांचा श्वास क्षणभर थांबला. यानंतर काही वेळातच फिजिओ मैदानात आले आणि त्यांनी चिनेल हेन्रीच्या प्रकृतीचा आढावा घेतला. चांगली गोष्ट म्हणजे फिजिओ आल्यानंतर चिनेल तिच्या पायावर उभी राहण्यात यशस्वी झाली. यानंतर तिला दोन खेळाडूंच्या मदतीने मैदानाबाहेर वैद्यकीय उपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर थोड्या विश्रांतीनंतर सामना पुन्हा सुरू झाला.

हेही वाचा – IND vs NZ : भारत-न्यूझीलंडने बंगळुरू कसोटीत केला मोठा पराक्रम, भारतात पहिल्यांदाच ‘या’ खास विक्रमाची झाली नोंद

न्यूझीलंडने फायनलमध्ये मारली धडक –

दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, या सामन्यात न्यूझीलंडच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ गडी गमावून केवळ १२८ धावा केल्या. वेस्ट इंडिजचा फॉर्म आणि त्यांची फलंदाजी पाहता या सामन्यात त्यांचा संघ १२९ धावांचे लक्ष्य सहज गाठेल असे वाटत होते, परंतु त्यांचा संघ २० षटकात ८ गडी गमावून केवळ १२० धावा करू शकला आणि न्यूझीलंड संघाने विजय मिळवत फायनलमध्ये धडक मारली

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wi vs nz semi final chinelle henry leaves the field after getting hit on her face video viral during wi w vs nz w match vbm