India vs Australia 4th Test Match Updates:ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने अप्रतिम खेळी केली. सामन्याच्या चौथ्या दिवशी विराट कोहलीने आपला क्लास दाखवत कांगारू गोलंदाजांना थक्क केले. विराट कोहली संपूर्ण डावात नियंत्रणात दिसला. त्याच्या दमदार खेळीचे सर्वजण कौतुक करत आहेत. विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मानेही इन्स्टावर एक स्टोरी टाकून विराटचे कौतुक केले आहे.
अनुष्का शर्माने शेअर केली इन्स्टा स्टोरी –
अनुष्का शर्माने विराटचा व्हिडिओ पोस्ट करत तिच्या स्टोरीमध्ये लिहिले आहे की, ‘आजारपणात खेळत राहण्याची हीच मानसिकता मला नेहमीच प्रेरणा देत असते.’ म्हणजे विराट कोहली खेळताना आजारी होता. मात्र, तिसऱ्या दिवशी फलंदाजीला आल्यानंतर कोहलीला आजाराची कोणतीही लक्षणे दिसली नाहीत.
शानदार शतकाचे द्विशतकात रूपांतर करण्यापूर्वी विराट कोहली १८६ धावांवर बाद झाला. त्याचे अवघ्या १४ धावांनी द्विशतक हुकले. अहमदाबाद कसोटीत कोहलीने ३६४ चेंडूत १८६ धावांची इनिंग खेळली. विराटने १२०५ दिवस, २३ सामने आणि ४१ डावांनंतर या फॉरमॅटमध्ये शतक झळकावले. विराटच्या १८६ धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ९ बाद ५७१ धावा केल्या.
विराट कोहलीचे २८वे कसोटी शतक –
कसोटी क्रिकेटमध्ये कोहलीचा हा सर्वात मोठा शतकाचा दुष्काळ होत. २७व्या शतकानंतर त्याने २८वे शतक पूर्ण करण्यासाठी एकूण ४१ डाव घेतले. यापूर्वी त्याने ११वे ते १२वे शतक यादरम्यान ११ डाव घेतले होते. या शतकाने कोहलीने सुटकेचा नि:श्वास सोडला असेल. विराट कोहलीचे हे २८वे कसोटी शतक आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याच्या संख्या ७५ झाली आहे.
हेही वाचा – IND vs AUS 4th Test: … म्हणून विराट कोहलीने शुबमन गिलचा पिरगळला हात, VIDEO होतोय व्हायरल
विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडला –
विराट कोहलीच्या कसोटी कारकिर्दीतील हे ७५ वे शतक आहे. त्याने या टप्प्यावर पोहोचण्यासाठी सर्वात जलद शतक करण्याचा विश्वविक्रम केला आहे. कोहलीच्या आधी हा विक्रम क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने ५६६ डावांत ७५ शतके पूर्ण केली, तर कोहलीने ५५२ डावांत हा पराक्रम केला.