Serious allegations by Hasin Jahan on Mohammad Shami: भारताचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमी आयपीएल २०२३ मध्ये गुजरात टायटन्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. शमीने या संघाला आपल्या गोलंदाजीच्या जोरावर बऱ्याच सामन्यात विजय मिळवून दिला आहे. मात्र आता शमीच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. त्याची पत्नी हसीन जहाँने शमीविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
कोलकाता उच्च न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्याने हसीन जहाँने शमीच्या अटकेसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मोहम्मद शमीने तिच्याकडे हुंडा मागितल्याचा आरोप हसीन जहाँने आपल्या याचिकेत केला आहे. याशिवाय तिने शमीवर परदेश दौऱ्यावर असताना अफेअर केल्याचा आरोपही केला.
शमीच्या अटक वॉरंटला स्थगिती देण्यात आली होती –
२०१९ च्या सुरुवातीला सत्र न्यायालयाने शमीविरुद्ध अटक वॉरंट आणि फौजदारी खटल्याला स्थगिती दिली होती. त्यामुळे हसीन जहाँ हायकोर्टात गेली. या वर्षाच्या सुरुवातीला कोलकाता कोर्टाने शमीला हसीन जहाँला दरमहा ५०,०००रुपये देण्याचे आदेश दिले होते. मात्र, जहाँने १० लाख रुपयांची मागणी केली होती. येथेही निर्णय तिच्या बाजूने लागला नाही आणि त्यामुळेच तिने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
हेही वाचा – Virat vs Gautam: ‘मग आता तू मला शिकवणार?’, एका प्रत्यक्षदर्शीने सांगितली विराट-गौतमच्या वादाची संपूर्ण कहाणी
जहाँचे मोहम्मद शम्मीवर गंभीर आरोप –
जहाँने पुढे दावा केला की, मोहम्मद शमीने वारांगनाशी संपर्क ठेवण्यासाठी आणखी एक मोबाईल फोन वापरत होता. हा फोन लाल बाजार पोलिसांनी जप्त केला आहे. पण शमीचे अजूनही त्या मुलींशी संबंध आहेत. तसेच हसीन जहाँने शमीवर मॅच फिक्सिंगचा आरोपही केला होता. बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाची चौकशी करून शमीला क्लीन चिट दिली.
संपूर्ण वाद २०१८ मध्ये सुरू झाला –
या संपूर्ण वादाला २०१८ साली सुरुवात झाली. त्यावेळी हसीन जहाँच्या आरोपानंतर मोहम्मद शमी आणि त्याचा भाऊ हसीब अहमद यांची चौकशी करण्यात आली होती. या चौकशीनंतर अलीपूर न्यायालयात शमीविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. मात्र, नंतर हे वारंट मागे घेण्यात आले.