भारताच्या युवा टेनिसपटूंना जगभरातील सर्वोत्तम खेळाडूंविरुद्ध चमक दाखवण्याची संधी मिळावी, यासाठी चेन्नई खुल्या स्पर्धेत भारताच्या दुहेरीतील दोन जोडय़ांना ‘वाइल्डकार्ड’ देण्याचे संयोजकांनी ठरवले आहे. विष्णुवर्धन आणि सनम सिंग तसेच जीवन एन. आणि एन. श्रीराम बालाजी या भारताच्या दोन जोडय़ा आता चेन्नईत खेळताना दिसतील. या स्पर्धेत भारताचे सात टेनिसपटू दुहेरीत खेळणार आहेत. महेश भूपती कॅनडाच्या डॅनियल नेस्टोरसह, रोहन बोपण्णा अमेरिकेच्या राजीव रामसह आणि लिएण्डर पेस फ्रान्सच्या एडवर्ड रॉजर व्हॅसेलिनसह खेळणार आहे.   

Story img Loader