पाठीला झालेल्या दुखापतीमुळे भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेला मुकावं लागलं आहे. बुमराहच्या जागी उमेश यादवला भारतीय संघात स्थान मिळालं आहे. मात्र जसप्रीत बुमराहने आपल्या ट्विटर अकाऊंटवर, मी नव्या जोमाने पुनरागमन करेन असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे.

दुखापती हा कोणत्याही खेळाडूच्या आयुष्यातल्या महत्वाचा भाग असतो, त्याला टाळता येत नाही. मला दाखवलेल्या पाठींब्यासाठी मी आपला आभारी आहे, लवकरच भारतीय संघात पुनरागमन करेन, अशा आशयाचा संदेश देत बुमराहने आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.

२ ऑक्टोबरपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने १-१ अशी बरोबरी साधली आहे. आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेत बुमराहला भारतीय संघात विश्रांती देण्यात आली होती. मात्र सध्या बुमराहला झालेली दुखापत पाहता बांगलादेशविरुद्ध मर्यादीत षटकांच्या मालिकेतही बुमराहला विश्रांती मिळण्याची शक्यता आहे.

Story img Loader