Ben Stokes on cricket Tour of India: इंग्लंड क्रिकेट संघाचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स पुढील वर्षी २०२४ मध्ये भारतीय क्रिकेट संघाविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे. वास्तविक, पुढच्या वर्षी २०२४ मध्ये इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. कसोटी संघाचा कर्णधार गुडघ्याच्या समस्येमुळे कसोटी मालिकेतून बाहेर पडू शकतो. अलीकडेच, बेन स्टोक्सने आगामी विश्वचषक २०२३ आधी एकदिवसीय फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे. विश्वचषकानंतर स्टोक्सच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्याला भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकावे लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बेन स्टोक्सने गुरुवारी न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी पत्रकारांना सांगितले की, “मला माहित आहे की काय होणार आहे. मी नाही वाटत हे सांगण्याची ही योग्य वेळ आहे, असे मला वाटत नाही. मी काही तज्ञांशी याबाबत बोललो आहे. माझ्या डोक्यात एक योजना आहे, जेणेकरून मी यातून लवकर बरा होऊ शकतो.

हेही वाचा: World Cup 2023: “जे सूर्या करू शकतो ते रोहित-विराट…”, हरभजनने सूर्यकुमार यादवच्या विश्वचषक निवडीबाबत केले सूचक विधान

स्टोक्स पुढे म्हणाला की, “मी कसा बरा होईल हे जाणून घेणे माझ्यासाठी अधिक महत्वाचे आहे. मला हे सांगायला अत्यंत आनंद होत आहे की, विश्वचषकानंतर आमच्या संघात खूप बदल होणार आहेत. त्यासाठी आम्ही एक अतिशय चांगली योजना आखत आहोत. त्या योजनेनुसार पुढील काही वर्षाचा एक आराखडा आखत आहोत. त्यानुसार युवा खेळाडूंना कशी संधी मिळेल हे आमच्या दृष्टीने अधिक गरजेचे आहे. पुढच्या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये भारतात मला अस्सल अष्टपैलू म्हणून खेळायचे आहे. या हिवाळ्यात हा वर्ल्ड कप खेळायचा आहे पण त्यासाठी आधी या गुडघ्याच्या दुखण्यावर मला मात करायची आहे.

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत कॅप्टन स्टोक्स उपलब्ध होणार नाही?

इंग्लंड संघाला २०२४ मध्ये पाच कसोटी सामन्यांसाठी भारत दौऱ्यावर यायचे आहे. पण त्याआधी टीम २०२३च्या वन डे वर्ल्ड कपसाठी भारतात येणार आहे. गुडघ्याच्या समस्येमुळे स्टोक्सने वन डेतून निवृत्ती घेतली. मात्र आगामी एकदिवसीय विश्वचषकापूर्वी तो निवृत्ती मागे घेतली आहे. अशा स्थितीत विश्वचषकानंतर त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया होऊ शकते, त्यानंतर स्टोक्स भारताविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडू शकतो.

हेही वाचा: Harbhajan Singh: ‘भारत पाकिस्तानशी खेळताना घाबरतो’ या विधानावर हरभजन नजम सेठींवर भडकला; म्हणाले, “हे आजकाल कोणती नशा…”

गुडघ्याच्या शस्त्रक्रियेतून त्याला संघात पुनरागमन करण्यासाठी किमान ८-१२ आठवडे लागतील, ऑपरेशन आणि पुनर्वसनासाठी आवश्यक कालावधी यावर सर्वकाही अवलंबून असणार आहे. मात्र, विश्वचषकानंतर स्टोक्सने गुडघ्याच्या शस्त्रक्रियेचा पर्याय निवडल्यास तो भारत दौऱ्याला मुकण्याची दाट शक्यता आहे. मात्र, पुढील आयपीएल २०२४ पर्यंत स्टोक्स पुनरागमन करू शकतो, तो चेन्नई सुपर किंग्जसाठी उपलब्ध असेल.