Harmanpreet Kaur on Asian Games: बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने एलबीडब्ल्यू आऊट झाल्यानंतर रागाच्या भरात तिची बॅट स्टंपवर फेकून मारली. यानंतर, आयसीसीने त्याच्या मॅच फीच्या ७५ टक्के कपातीसह तिच्या खात्यात तीन डिमेरिट पॉइंट देखील जोडले. एवढेच नाही तर हरमनप्रीतला आता तिच्या गैरवर्तनाबद्दल आणखी शिक्षा होऊ शकते कारण क्रिकेटची सर्वोच्च संस्था आयसीसी भारतीय कर्णधारावर दोन सामन्यांची बंदी घालण्याच्या तयारीत आहे.

३५ वर्षीय हरमनप्रीतच्या खात्यात तीन डिमेरिट पॉइंट्स दिल्यामुळे तिच्यावर किमान दोन सामन्यांच्या निलंबनाची टांगती तलवार आहे. याचा अर्थ आता ती आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३च्या दोन सामन्यांतून बाहेर पडणार हे निश्चित दिसते. मैदानावरील अंपायरने आऊट दिल्यानंतर तिने रागाच्या भरात स्टंपवर बॅट आदळली. कारण अंपायरने दिलेला निर्णय हा वादग्रस्त होता. तिच्या मते चेंडू पॅडला लागण्याआधी तो बॅटला लागला होता. मॅचनंतर प्रेझेंटेशन सेरेमनीदरम्यान हरमन खराब अंपायरिंगच्या विरोधात तिने टीका केली. मालिकेचा निर्णायक सामना रोमहर्षक बरोबरीत संपल्यानंतर, कर्णधार हरमनप्रीत कौरने सामन्यातील अंपायरवर खरमरीत टीका केली आणि यास “निंदनीय” म्हणून वर्णन केले. काही निर्णयांमुळे ती “खरोखर निराश” झाली होती.

State Government approved one time transfer for Community Health Officers under National Health Mission
आता समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्याही बदल्या होणार
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
anti-ragging rules, non-compliance of anti-ragging rules, National Medical Commission,
रॅगिंगविरोधी नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचा वैद्यकीय महाविद्यालयांना इशारा
constitution of india credit loksatta
चतु:सूत्र : संविधाननिर्मितीचे श्रेय कोणाला?
ICC Banned National Cricket League USA
एक चूक अन् ICCने ‘या’ लीगवर घातली बंदी, सचिन तेंडुलकर-गावस्करांशी आहे कनेक्शन
abhishek bachchan aishwarya rai
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…
Captain Rohit Sharma reacts after disappointing Adelaide Test performance by batsmen sports news
फलंदाजांची कामगिरी निराशाजनक, गोलंदाजीत बुमराला साथ आवश्यक! अॅडलेड कसोटीनंतर कर्णधार रोहितची प्रतिक्रिया
Prithviraj Chavans statement regarding the election results satara
निवडणुकीच्या निकालाबाबत सरकारची दडपशाही ब्रिटिशांपेक्षाही वाईट: पृथ्वीराज चव्हाण

हरमनप्रीत इथेच थांबली नाही तर तिने शेवटी फोटो सोहळ्यादरम्यानही बांगलादेशला अंपायर्सना फोटो काढण्यासाठी आमंत्रित करण्यास सांगितले. वृत्तानुसार, भारतीय कर्णधार म्हणाली, “फक्त आपण दोन्ही संघ इथे का आहोत? अंपायर्सना बोलवा ज्यांनी तुमच्यासाठी सामना टाय केला. आम्हाला त्यांच्यासोबत एक फोटो काढण्याची इच्छा आहे.” भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधाराच्या या कमेंटवर बांगलादेश महिला क्रिकेट संघाची कर्णधार निगार सुलतानाला खूप राग आला आणि तिने आपल्या खेळाडूंना पुन्हा ड्रेसिंग रूममध्ये नेले.

हेही वाचा: Harmanpreet Kaur: हरमनप्रीतने केलेल्या कृतीवर बांगलादेशच्या कर्णधाराची खोचक टीका; म्हणाली, “वागण्या-बोलण्याचे भान…”

आयसीसीच्या नियमांनुसार हरमनप्रीतवर दोन सामन्यांची बंदी घातली जाऊ शकते

आयसीसीच्या नियमांनुसार, चार डिमेरिट पॉइंट म्हणजे खेळाडूला दोन सामन्यांच्या निलंबनाला सामोरे जावे लागेल. दोन निलंबन गुण एक कसोटी आणि दोन टी२० किंवा एक एकदिवसीय सामना खेळता येणार नाही. याचाच अर्थ हरमनप्रीत कौरला आता भारताच्या पुढील दोन सामन्यांतून वगळण्याची शक्यता आहे. भारतीय महिला संघ आता आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी चीनच्या दौऱ्यावर जाणार असून हरमनप्रीत कौरला तेथे दोन सामने खेळायचे आहेत त्यामुळे ती आशियाई क्रीडा स्पर्धेला मुकण्याची शक्यता आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय कर्णधार या प्रकरणात भाग्यवान असू शकते कारण आशियाई खेळ आयसीसीच्या अखत्यारीत येत नाहीत, त्यामुळे ती या स्पर्धेत सहभागी होऊ शकते. जरी ती आयसीसीने मान्यता दिलेल्या नियमानुसार पुढील सामन्यांमध्ये खेळू शकत नाही तरी, याबाबत अद्याप हरमनप्रीतवरील बंदीची अधिकृत पुष्टी कोणीही केलेली नाही.

जर सामन्याबद्दल बोलायचे झाले तर २२६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हरमनप्रीत ३४व्या षटकात नाहिदा अख्तरच्या चेंडूवर स्वीप करायला गेली पण भारतीय कर्णधाराचा चेंडू शॉट हुकला आणि तो चेंडू पॅडला लागला. नाहिदाच्या अपीलवर अंपायरने बोट वर केले ज्यामुळे हरमनप्रीत चिडली. पॅव्हेलियनकडे जाताना, सीमारेषेवर पोहोचल्यावर तिने प्रेक्षकांना अंगठा दाखवला.

Story img Loader