Will Jacks of Pretoria Capitals hits a blistering century : आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा भाग असलेला विल जॅक्स सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडच्या या फिरकी अष्टपैलू खेळाडूने दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणाऱ्या टी-२० लीगमध्ये खळबळ उडवून दिली आहे. गुरुवारी रात्री झालेल्या सामन्यात विल जॅक्सने अवघ्या ४१ चेंडूत शतक झळकावले. जॅक्सने आपल्या शतकी खेळीत ८ चौकार आणि ९ षटकार मारले. याशिवाय या अष्टपैलू खेळाडूने दोन विकेट्सही घेतल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दक्षिण आफ्रिकन टी-२० लीग म्हणजेच एसए टी-२० लीगमध्ये भारतीय फ्रेंचायझी प्रिटोरिया कॅपिटल्सकडून खेळणारा विल जॅक्स हा आयपीएलमधील आरसीबी संघाचा खेळाडू आहे. दुखापतीमुळे गेल्या मोसमात विल जॅक्स खेळला नसला, तरी इंग्लंडच्या या खेळाडूची प्रतिभा पाहून विराट कोहलीच्या संघाने त्याला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

आता विल जॅक्स आयपीएल २०२४ मध्ये आरसीबीकडून खेळताना दिसणार आहे. तो टॉप ऑर्डरचा खेळाडू आहे आणि सलामीला किंवा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. विल जॅक्स फलंदाजीबरोबर फिरकी गोलंदाजही आहे. टी-२० फॉरमॅटमध्ये तो स्पेशालिस्ट खेळाडू मानला जातो.

हेही वाचा – Team India : ‘हार्दिक-शिवम दोघांनाही टी-२० विश्वचषक संघात स्थान मिळू शकते…’, माजी दिग्गजाचे मोठे विधान

गुरुवारी रात्री, दक्षिण आफ्रिका टी-२० लीगमध्ये लखनऊ सुपर जायंट्स फ्रँचायझी डर्बन जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझी प्रिटोरिया कॅपिटल्स यांच्यात सामना झाला. विल जॅक्सने शानदार खेळी साकारुन प्रिटोरिया कॅपिटल्स संघाला १७ धावांनी विजय मिळवून दिला. झंझावाती शतक झळकावण्याबरोबरच विल जॅक्सने ३ षटकांत १८ धावा देऊन दोन विकेट्सही घेतल्या.

हेही वाचा – AUS vs WI : जोश हेजलवूडने विकेट्स घेताच ऑस्ट्रेलियाने रचला इतिहास, १४७ वर्षांच्या कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच ‘हे’ घडलं

विल जॅक्सच्या शतकाच्या जोरावर प्रिटोरिया कॅपिटल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ गडी गमावून २०४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात डर्बन जायंट्स संघाला निर्धारित षटकात ७ गडी गमावून केवळ १८७ धावा करता आल्या. अशाप्रकारे प्रिटोरिया कॅपिटल्सने १७ धावांनी विजय मिळवला.