पीटीआय, नवी दिल्ली : भारताचा अनुभवी फलंदाज केएल राहुल आगामी आशिया चषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेला मुकण्याची दाट शक्यता आहे. तसेच श्रेयस अय्यरच्या आशिया चषक आणि त्यानंतर होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील सहभागाबाबतही साशंकता आहे. मांडीच्या दुखापतीमुळे राहुलवर, तर पाठीच्या दुखापतीमुळे अय्यरवर शस्त्रक्रिया करण्यात आली.

गेल्या काही काळापासून हे दोघेही क्रिकेटपासून दूर आहेत. या दोघांना जागतिक कसोटी अजिंक्यपदाची अंतिम लढत, तसेच सध्या सुरू असलेल्या वेस्ट इंडिज दौऱ्याला मुकावे लागले आहे. हे दोघे मैदानावर कधी परतणार याबाबत भाष्य करणे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टाळले होते. हे दोघेही तंदुरुस्तीवर मेहनत घेत

Satyendra Das
राम मंदिराचे मुख्य पूजारी सत्येंद्र दास यांची प्रकृती चिंताजनक; ब्रेन स्ट्रोकचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Jitendra Awhad
Namdeo Shastri : “समाजासाठी अत्यंत घातक गोष्ट”, नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानंतर आव्हाडांची प्रतिक्रिया चर्चेत
Virat Kohli returns to Ranji Trophy cricket sport news
कोहलीला सूर गवसणार? रणजी करंडकात आज १२ वर्षांनी
gangster subhash singh to bring in vasai in samay chauhan murder case after discharge from hospital
गँगस्टर सुभाषसिंग ठाकूर अखेर कारागृहात; समय चौहान हत्याकांडात वसईत आणण्याचा मार्ग मोकळा
Rohit Sharma complains to BCCI about Sunil Gavaskar after blames his criticism BGT in Australia
Rohit Sharma : रोहित शर्माने बीसीसीआयकडे केली सुनील गावस्करांची तक्रार? नेमकं काय आहे कारण? जाणून घ्या
IND vs ENG Harry Brook Clean Bowled on Varun Chakravarthy in 2nd T20I Despite no Smog
IND vs ENG: “बघ धुकं आहे का?”, हॅरी ब्रुक वरूणच्या गोलंदाजीवर पुन्हा क्लीन बोल्ड, विकेट पाहून झाला चकित; VIDEO व्हायरल
loksatta readers reaction on chaturang articles
पडसाद : बुरसटलेपण कधी कमी होणार?

असून टप्प्याटप्प्याने सरावाचा कालावधी वाढवत असल्याचे ‘बीसीसीआय’कडून काही दिवसांपूर्वी सांगण्यात आले होते. परंतु या दोघांनाही पूर्ण तंदुरुस्ती मिळवण्यासाठी आणखी काही काळ लागू शकेल. ‘‘राहुल आणि श्रेयस ५० षटकांचे क्रिकेट खेळण्याइतपत तंदुरुस्त नाहीत. त्यातच आशिया चषक स्पर्धेचे सामने श्रीलंकेतही होणार असून तेथील उष्ण आणि दमट वातावरणात खेळणे त्यांच्यासाठी मोठे आव्हान ठरू शकेल. मात्र, आशिया चषकानंतर आणि विश्वचषकाआधी होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी राहुल तंदुरुस्त होईल असे ‘बीसीसीआय’च्या वैद्यकीय पथकाचे मत आहे,’’ असे ‘बीसीसीआय’मधील सूत्रांकडून सांगण्यात आले.

‘‘श्रेयसने सरावाला सुरुवात केली आहे, पण त्याच्या विश्वचषकातील सहभागाबाबत संभ्रम कायम आहे. विश्वचषकामध्ये पूर्णपणे तंदुरुस्त असलेला श्रेयस खेळावा असे संघ व्यवस्थापनाला वाटत असेल तर, तसे होण्याची शक्यता कमी आहे. त्याच्यासाठी एकदिवसीयपेक्षा ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये पुनरागमन करणे सोपे जाईल. मात्र, आम्ही आशा सोडलेली नाही,’’ असेही ‘बीसीसीआय’च्या सूत्राने स्पष्ट केले. राहुल आता तंदुरुस्तीवर मेहनत घेत असून त्याने यष्टीरक्षणाच्या सरावाला सुरुवात केली आहे. मात्र, मांडीच्या दुखापतीतून सावरल्यानंतर थेट ५० षटके यष्टीरक्षण करणे राहुलसाठी आव्हान ठरेल. आशिया चषक स्पर्धेला ३१ ऑगस्टपासून सुरुवात होणार असून पाकिस्तान आणि श्रीलंका या स्पर्धेचे सह-यजमानपद भूषवणार आहेत. ‘बीसीसीआय’ने आपला संघ पाकिस्तानात पाठवण्यात नकार दिल्याने भारताचे सर्व सामने श्रीलंकेत होतील.

राहुलची भूमिका महत्त्वाची

एकदिवसीय क्रिकेटमध्ये मधल्या फळीत फलंदाजी करताना राहुलने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. श्रेयस आणि ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत राहुलचा अनुभव भारतासाठी फायदेशीर ठरेल. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना राहुलने १८ एकदिवसीय सामन्यांत ५३च्या सरासरीने आणि ९९.३३च्या धावगतीने ७४२ धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि सात अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने यष्टीरक्षक म्हणूनही प्रभावित केले आहे.

Story img Loader