आयपीएलच्या सहाव्या हंगामाचे विजेते मुंबई इंडियन्सची सातव्या हंगामात मात्र घसरगुंडी उडाली आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या पहिल्या टप्प्यातील चारही लढती मुंबई इंडियन्स संघाने गमावल्या आहेत. लसिथ मलिंगा, कीरेन पोलार्ड, माइक हसी अशा दिग्गजांचा समावेश असूनही मुंबई इंडियन्सना विजयाने हुलकावणी दिली आहे. आखाती टप्प्याचा शेवट विजयाने करण्याची संधी मुंबई इंडियन्स संघाला सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीने मिळणार आहे. रोहित शर्मा, माइक हसी, आदित्य तरे, अंबाती रायुडू चौघांनाही मोठी खेळी करण्यात अपयश आले आहे. गोलंदाजीत लसिथ मलिंगाला झहीर, हरभजन, ओझा यांची साथ मिळणे अत्यावश्यक आहे. पोलार्ड आणि कोरे अँडरसन आपली छाप पाडू शकलेले नाहीत.
दुसरीकडे सनरायजर्स हैदराबादला सर्वागीण सुधारणा आवश्यक आहे. आरोन फिंच, डेव्हिड वॉर्नर जोडीला अन्य फलंदाजांनी साथ देणे आवश्यक आहे. डेल स्टेन, भुवनेश्वक कुमार, अमित मिश्रा या त्रिकुटावर गोलंदाजाची भिस्त आहे. डॅरेन सॅमीला सूर गवसणे हैदराबादसाठी गरजेचे आहे.

संघ : मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), लसिथ मलिंगा, कीरेन पोलार्ड, हरभजन सिंग, अंबाती रायुडू, माइक हसी, झहीर खान, प्रग्यान ओझा, कोरे अँडरसन, जोश हॅझलवूड, मुरलीधरन गौतम, आदित्य तरे, अपूर्व वानखेडे, र्मचट डि लाँज, क्रिश्मर सँटोकी, बेन डंक, पवन सुन्याल, सुशांत मराठे, जसप्रीत बुमराह, श्रेयस गोपाळ, लेंडल सिमन्स.

सनरायजर्स हैदराबाद : शिखर धवन (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, आरोन फिंच, वेणुगोपाळ राव, लोकेश राहुल, डेल स्टेन, डॅरेन सॅमी, भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रा, इरफान पठाण, इशांत शर्मा, ब्रेंडान टेलर, मॉइझेस हेन्रिके, जेसन होल्डर, श्रीकांत अनिरुद्ध, मनप्रीत जुनेजा, अमित पौनीकर, नमन ओझा, आशिष रेड्डी, चामा मिलिंद, परवेझ रसूल, प्रशांत परमेश्वरन, करण शर्मा.

Story img Loader