आयपीएलच्या सहाव्या हंगामाचे विजेते मुंबई इंडियन्सची सातव्या हंगामात मात्र घसरगुंडी उडाली आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या पहिल्या टप्प्यातील चारही लढती मुंबई इंडियन्स संघाने गमावल्या आहेत. लसिथ मलिंगा, कीरेन पोलार्ड, माइक हसी अशा दिग्गजांचा समावेश असूनही मुंबई इंडियन्सना विजयाने हुलकावणी दिली आहे. आखाती टप्प्याचा शेवट विजयाने करण्याची संधी मुंबई इंडियन्स संघाला सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीने मिळणार आहे. रोहित शर्मा, माइक हसी, आदित्य तरे, अंबाती रायुडू चौघांनाही मोठी खेळी करण्यात अपयश आले आहे. गोलंदाजीत लसिथ मलिंगाला झहीर, हरभजन, ओझा यांची साथ मिळणे अत्यावश्यक आहे. पोलार्ड आणि कोरे अँडरसन आपली छाप पाडू शकलेले नाहीत.
दुसरीकडे सनरायजर्स हैदराबादला सर्वागीण सुधारणा आवश्यक आहे. आरोन फिंच, डेव्हिड वॉर्नर जोडीला अन्य फलंदाजांनी साथ देणे आवश्यक आहे. डेल स्टेन, भुवनेश्वक कुमार, अमित मिश्रा या त्रिकुटावर गोलंदाजाची भिस्त आहे. डॅरेन सॅमीला सूर गवसणे हैदराबादसाठी गरजेचे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा