Rishabh Pant on MS Dhoni: एम.एस. धोनीची अविश्वसनीय आयपीएल कारकीर्द हळूहळू संपुष्टात येत आहे. माजी क्रिकेटपटू आणि तज्ञ विश्लेषक दीप दासगुप्ता यांच्या मते, एम.एस. धोनीनंतर त्याचाच सहकारी खेळाडू टीम इंडियाचा डावखुरा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत, चेन्नई सुपर किंग्जमध्ये अव्वल यष्टीरक्षक म्हणून त्याची जागा घेऊ शकतो.

चेन्नई सुपर किंग्जने ४२ वर्षीय महान यष्टिरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनीला आयपीएल २०२४ साठी कायम ठेवले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला आयपीएल २०२३च्या अंतिम फेरीतही तो दिसला होता, जिथे त्याने चेन्नईला पाचवे विजेतेपद मिळवून दिले होते. या विजयाने सीएसकेने मुंबई इंडियन्सच्या पाच विजेतेपदांची बरोबरी केली आहे.

KL Rahul Statement on Sanjiv Goenka Animated Chat in IPL 2024 loss Said Wasn’t the nicest thing Ahead
KL Rahul: “मैदानावर जे काही घडलं ते फार चांगलं…”, संजीव गोयंका भर मैदानात भडकल्याच्या घटनेवर केएल राहुलने पहिल्यांदाच केलं वक्तव्य
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
MS Dhoni and wife Sakshi casting vote in Ranchi reaches new heights crowd Craze to capture video
MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीने पत्नी साक्षीसह रांचीमध्ये केले मतदान, चाहत्यांच्या गर्दीने घेरल्याचा VIDEO व्हायरल
Dharavi Assembly Constituency election Dharavi Redevelopment Mumbai print news
‘धारावी बचाव’चा कार्यकर्ता रिंगणात; मतदारसंघातून गायकवाड कुटुंबाची मक्तेदारी मोडीत काढणार ?
MS Dhoni impressed by Mumbai Ayush Mhatre
MS Dhoni : मुंबईच्या १७ वर्षीय फलंदाजाने जिंकले माहीचे मन, IPL 2025 च्या लिलावापूर्वी CSK ने दिली ‘ही’ खास ऑफर
Mumbai Indians will buy five of their old players for IPL 2025
Mumbai Indians : मुंबई इंडियन्स विक्रमी सहाव्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी ‘या’ पाच जुन्या शिलेदारांवर लावणार बोली, जाणून घ्या कोण आहेत?
Hardik Pandya Trolled For His Behavior and Showing Attitude to Arshdeep Singh in IND vs SA 2nd T20I
IND vs SA: “आता उभा राहून मजा बघ…”, हार्दिक पंड्याला मोठेपणा करणं पडलं भारी, अर्शदीपला बोललेल्या वाक्यानंतर होतोय ट्रोल

हेही वाचा: IND vs AUS: पाचव्या टी-२० सामन्यात पाऊस ठरणार खलनायक? एम. चिन्नास्वामी स्टेडियमची काय आहे आकडेवारी, जाणून घ्या

माजी भारतीय क्रिकेटपटू दीप दासगुप्ता यांनी अलीकडेच, “ऋषभ पंत २०२५ पर्यंत सीएसकेच्या संघात पिवळ्या जर्सीमध्ये आपल्या सर्वांना खेळताना दिसेल असा अंदाज व्यक्त केला आहे.”पंत त्याचा नवीन आयपीएल संघ शोधण्याची एक मोठी शक्यता असल्याची चर्चा त्यांनी केली. २०१६ मध्ये दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीसह आयपीएलमध्ये पदार्पण केल्यापासून ऋषभ पंत दिल्ली संघाचा अविभाज्य भाग आहे.

दीपदास गुप्ता म्हणाले, “आयपीएल २०२५ पर्यंत त्यांना ऋषभ पंत चेन्नईकडून खेळताना दिसल्यास मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. एम.एस. धोनी आणि ऋषभ पंत यांची विकेटकीपिंगची शैली जवळपास सारखीच आहे. साहजिकच ऋषभला एम.एस. आवडतो आणि एम.एस.लाही तो खूप आवडतो. ते खूप वेळ एकत्र घालवतात. त्यांचे नाते आणि ऋषभची विचारसरणी खूप समान आहे, कारण तो खूप आक्रमक आणि सकारात्मक खेळाडू आहे. तो नेहमी जिंकण्याबद्दल बोलत राहतो, हेच धोनीच्याही डोक्यात सुरु असते. त्यामुळे त्याचे हे विचार चेन्नई सुपर किंग्ससाठी फायद्याचे ठरतील, असे मला वाटते.”

हेही वाचा: IND vs AUS: फक्त १९ धावा…; बंगळुरूमध्ये ऋतुराज गायकवाड मोडणार कोहलीचा विक्रम? जाणून घ्या

गेल्या डिसेंबरमध्ये ऋषभ पंत एका जीवघेण्या कार अपघाताचा बळी ठरला होता, त्यानंतर त्याला या वर्षाच्या सुरुवातीला संपूर्ण आयपीएल २०२३ हंगाम सोडावा लागला होता. तरीही, जवळपास १२ महिन्यांत एकही स्पर्धात्मक सामना खेळलेला नसताना, पंतला आगामी लिलावापूर्वी आयपीएल २०२४ रिटेन्शनवर दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीने कायम ठेवले आहे. सध्या तो त्याच्या तंदुरुस्तीवर खूप भर देत आहे. पंत यंदाच्या आयपीएलमध्ये पुनरागमन करणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. १९ डिसेंबर रोजी दुबईमध्ये लिलाव पार पडणार आहेत, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे. लोकसभेच्या निवडणुकीमुळे यंदाची आयपीएल भारतात होणार की भारताबाहेर, हे पाहणे देखील महत्वाचे असणार आहे. Rishabh Pant will replace MS Dhoni in CSK former