India vs Bangladesh, Rohit Sharma Bowling: एकदिवसीय विश्वचषक २०२३ची मोहिमेला भारतीय संघाने शानदार सुरुवात केली आहे. मायदेशातील भूमीवर होत असलेल्या या विश्वचषकात फिरकी गोलंदाजांना काही सामन्यात जर पाहिले तर मदत ही खूप मोठ्या प्रमाणात मिळत आहे. त्यामुळेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात भारतीय संघाच्या सराव सत्रात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा गोलंदाजी करताना दिसला, त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा चांगला फॉर्म दिसत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच विश्वचषक खेळणाऱ्या टीम इंडियाने पहिले तीन सामने जिंकून स्पर्धेत शानदार सुरुवात केली आहे. टीम इंडियाचा समतोल खूप चांगला आणि मजबूत दिसत आहे. या संघात शुबमन गिल, इशान किशन आणि रोहित शर्मा यांसारख्या उत्कृष्ट युवा आणि अनुभवी खेळाडूंची सलामीची जोडी आहे. विराट कोहली आणि के.एल. राहुलसारखे जगातील सर्वोत्तम फलंदाज मधल्या फळीत आहेत.
हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजाच्या रूपाने जगातील अव्वल अष्टपैलू खेळाडूही या संघाचा भाग आहेत. याशिवाय संघात रविचंद्रन अश्विन आणि शार्दुल ठाकूरसारखे काही गोलंदाज आहेत, जे गरजेच्या वेळी चांगली फलंदाजी करू शकतात. अशा परिस्थितीत टीम इंडियाकडे जर कशाची कमतरता असेल तर ते काही फलंदाज आहेत जे गरजेच्या वेळी चांगली फलंदाजी करू शकतात.
अहमदाबादमध्ये शनिवारी झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या दणदणीत विजयानंतर भारतीय संघ रविवारी पुण्यनगरीत पोहचला. दुसऱ्या दिवशी विश्रांती न घेता थेट त्यांच्या हॉटेलमध्ये गेले. संघ व्यवस्थापनाने मंगळवारी पर्यायी सराव सत्र आयोजित केले. विशेष म्हणजे यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे स्टेडियम पूर्ण क्षमतेने भरले होते. एकप्रकारे भारताचा हॅट्रिकमॅन रोहित शर्मा ७ वर्षांनंतर भारतीय संघात गोलंदाजी करताना दिसणार आहे. रोहितने बांगलादेश सामन्यासाठी एक चक्रव्यूह आखले आहे.
रोहित शर्माने गोलंदाजीचा सराव केला
कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली हे करू शकतात. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी रोहितने पत्रकार परिषदेत गरज पडल्यास गोलंदाजीही करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, त्याने असेही सांगितले की त्याच्या बोटांमध्ये थोडी समस्या आहे, म्हणून तो गोलंदाजी करत नाही. काही दिवसांपूर्वी त्याला हाताला दुखापत झाली होती त्यामुळे तो गोलंदाजी करत नाही. गोलंदाजीचा त्याच्या फलंदाजीवर परिणाम होऊ नये अशी त्याची इच्छा आहे. मात्र, बांगलादेशविरुद्धच्या पुढील सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा नेटमध्ये गोलंदाजीचा सराव करताना दिसला.
स्टार स्पोर्ट्सच्या सौजन्याने, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ आणि फोटोमध्ये भारतीय संघाचा वरिष्ठ फिरकीपटू रविचंद्रन अश्विन नेटमध्ये रोहित शर्माला गोलंदाजीचे कौशल्य शिकवत असल्याचे दिसत आहे. टीम इंडियाच्या पुण्यात होणाऱ्या विश्वचषकाच्या चौथ्या सामन्याआधी रोहित शर्माने रविचंद्रन अश्विनच्या मार्गदर्शनाखाली गोलंदाजीचा सराव केला, यावरून येत्या सामन्यांमध्ये कर्णधार गोलंदाजीतही आपली जादू दाखवणार असे दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा रवींद्र जडेजाला गोलंदाजी करताना दिसला. माहितीसाठी की, उजव्या हाताचा ऑफ ब्रेक फिरकी गोलंदाज रोहित शर्माने यापूर्वीही अप्रतिम गोलंदाजी कौशल्य दाखवले आहे. रोहित शर्माने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत एकूण ९४ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत केवळ ११ विकेट्स आहेत. रोहित शर्माने आयपीएल २००९ मध्ये डेक्कन चार्जर्सकडून खेळताना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळलेल्या टी२० सामन्यात हॅटट्रिक विकेटही घेतली होती. रोहितने अभिषेक नायर, हरभजन सिंग आणि जेपी ड्युमिनी यांच्या विकेट्स घेतल्या, त्याची ही एकमेव हॅट्ट्रिक आहे.