Aakash Chopra on Rohit Sharma:टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू आणि सध्याचे क्रिकेट तज्ज्ञ आकाश चोप्रा यांना खात्री नाही की रोहित शर्मा संपूर्ण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) २०२३-२५ सायकलमध्ये भारताचे नेतृत्व करू शकेल की नाही. २०२१-२२च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर विराट कोहलीने पद सोडल्यानंतर रोहितची भारताचा कसोटी कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. विराट कोहलीने भारताला सलग दोनदा WTC फायनलमध्ये नेण्यात कर्णधार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली, पण संघाला एकही विजेतेपद जिंकता आले नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) २०२३चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दणदणीत विजय नोंदवला आणि टीम इंडियाचा २०९ धावांनी पराभव केला. या पराभवामुळे भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवरही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबरोबरच टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मालाही कर्णधारपदावरून हटवण्याची मागणी होत आहे. मात्र, बीसीसीआय त्याला यापुढेही कर्णधारपदी कायम ठेवू इच्छित आहे.
पराभवानंतर भारताच्या काही दिग्गज खेळाडूंनी रोहित शर्माला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, टीम इंडियाचा माजी खेळाडू आकाश चोप्राने रोहित शर्माबाबत मोठे वक्तव्य केले आहे. खरं तर, आकाश चोप्रा म्हणतो की, “रोहित शर्मा पुढच्या WTC साठी टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारेल की नाही याची खात्री नाही.” तसेच, त्याने रोहित शर्माच्या कर्णधार म्हणून केलेलं काम आणि फलंदाजीचेही कौतुक केले. “रोहितने कर्णधार केलेली कामगिरी किंवा फलंदाजीमध्ये दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही,” असेही तो म्हणाला.
रोहित एक महान कर्णधार आहे यात शंका नाही – आकाश चोप्रा
भारतीय संघाने जेव्हा सलग दुस-यांदा ट्रॉफी गमावली तेव्हा रोहित शर्माच्या कसोटी कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले गेले. यावर एका चाहत्याने जेव्हा आकाश चोप्राला रोहित शर्मा कसोटी कर्णधारपदी कायम राहणार का? असे विचारले तेव्हा त्याने त्याच्या यूट्यूब चॅनलवर उत्तर दिले की, “रोहित एक सक्षम आणि गुणी कर्णधार आहे, यात शंका नाही. तो एक चांगला कसोटी फलंदाज आहे, यातही शंका नाही. , परंतु भविष्य असे असेल का? मला १००% याबाबत काहीही खात्रीशीररित्या सांगू शकत नाही, कारण तुम्ही गेल्या दोन सायकलमध्ये फायनलला गेला आहात, परंतु एकदाही विजय मिळवू शकला नाहीत. शेवटी वय तुमच्या बाजूने नसते, त्यामुळे ही एक वस्तुस्थिती आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे.”
तो पुढे म्हणाला की, “जेव्हा तुम्ही पुढची दोन वर्षे आणि दुसरी WTC २०२५ सायकल पाहता, रोहित शर्माला खरोखरच कसोटी क्रिकेट खेळायचे असेल तर तो आणखी एक वर्ष कसोटी क्रिकेट खेळू शकतो. खरंतर सहा मालिकांमध्ये त्याला फॉर्म परत मिळवण्याची सुवर्ण संधी आहे. भारतीय क्रिकेट आज ज्या ठिकाणी उभे आहे, मला वाटत नाही की त्यांना जास्त विश्रांती दिली जाईल.”
आकाश चोप्रा पुढे म्हणाला की, “अशा परिस्थितीत तुम्हाला तिन्ही फॉरमॅट खेळायचे आहे, पण तुम्ही ते करू शकाल का? २०२३च्या अखेरीस तुम्ही दक्षिण आफ्रिका मालिकेतून परत येईपर्यंत निवडकर्ते पुढील WTC फायनलबद्दल विचार करायला लागतील का? त्यावेळी सायकल संपायला एक वर्ष उरले असेल. इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामने होणार आहेत. जेव्हा तुम्ही ऑस्ट्रेलियाला जाणार तेव्हा त्यांना बदलाचा विचार करावा लागेल आणि खरं तर हे खूप इंटरेस्टिंग असणार आहे.”