Sachin Tendulkar Statement On BCCI President: शुक्रवारी देशाची राजधानी नवी दिल्ली येथे आयोजित इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह २०२३ मध्ये एका विशेष अतिथीने भाग घेतला. ‘क्रिकेटचा देव’ म्हणून ओळखला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने ‘सचिनवाद आणि भारताची कल्पना’ या सत्रात आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये त्याने अनेक प्रश्नांची मनमोकळ्या मनाने उत्तर दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सचिन तेंडुलकर जितका शांत आहे तितकाच तो विनोदीही आहे. अनेक प्रसंगी तो आपल्या स्टाईलने सर्वांची मने जिंकतो. एका इंडिया टुडे टीव्ही शो कॉन्क्लेव्हमध्ये असे घडले. जेव्हा त्याला बीसीसीआयचे पुढील अध्यक्ष होण्याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्यानी असे उत्तर दिले की सगळेच थक्क झाले. सचिनने एक मजेदार किस्सा सांगून हे उत्तर दिले.

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने येथे बीसीसीआयच्या अध्यक्षपदाबाबत वक्तव्य केले आहे. बीसीसीआयचे विद्यमान आणि माजी अध्यक्ष क्रिकेटपटू झाले आहेत, सचिनही या पदावर कधी येईल का? असे विचारले असता, ज्याला सचिन तेंडुलकरने मजेशीर उत्तर दिले.

सचिन म्हणाला, मी वेगवान गोलंदाजी करत नाही (रॉजर बिन्नी, सौरव गांगुली मध्यमगती गोलंदाज होते), जेव्हा सौरव गांगुली विकेट घेत होता, तेव्हा तो १४० किमी प्रतितास वेगाने फेकण्याबद्दल बोलत होता, पण नंतर असे झाले. त्याच्या पाठीत समस्या निर्माण झाली. सचिन हसला आणि म्हणाला की, मी १४० पर्यंत फेकत नाही. म्हणजेच सचिनने या पदाचा प्रश्न एक प्रकारे टाळला आहे.

वनडे क्रिकेटचे भविष्य काय आहे?

सचिनने कसोटी क्रिकेटसोबतच एकदिवसीय क्रिकेटच्या भवितव्याबद्दलही सांगितले. सचिन म्हणाला की एकदिवसीय क्रिकेट कंटाळवाणे होत आहे हे खरे आहे. जेव्हा तुम्ही ५० षटकांच्या सामन्यात दोन चेंडू आणता तेव्हा तुम्ही रिव्हर्स स्विंग काढून टाकता. आता तुम्ही ३० यार्डच्या वर्तुळात ५ क्षेत्ररक्षक ठेवत आहात, मग फिरकीपटूंना त्रास होत आहे जिथे ते उघडू शकत नाहीत. एकदिवसीय क्रिकेट कंटाळवाणे होत आहे, ज्याचे पुनरुज्जीवन केले पाहिजे.

हेही वाचा – IND vs IRE: विश्वचषकापूर्वी टीम इंडिया आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार, दोन्ही संघात टी-२० सामन्यांची मालिका होणार

सचिन तेंडुलकरने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी, एकदिवसीय विश्वचषक यापासून एकदिवसीय क्रिकेटच्या भवितव्याबद्दलही बोललला, तसेच त्याच्या कारकिर्दीतील अनेक मजेदार किस्सेही सांगितले. .

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will sachin tendulkar be the next bcci president sachin gave a funny answer to this vbm