World Cup 2023 Team India Practice Jersey: भारतीय संघाचे विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मोठ्या सामन्यापूर्वी सराव सत्र आयोजित करण्यात आले आहे. टीम इंडिया चेन्नईला पोहोचली असून आता रविवारी वर्ल्ड कप मोहिमेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या उणिवा सुधारण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, टीम इंडियाचे खेळाडू नव्या सराव जर्सीत दिसले. यानंतर खेळाडूंचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.

ही जर्सी केशरी रंगाची असून विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांनी ती परिधान केलेला फोटो व्हायरल होत आहे. या फोटोबरोबर २०११च्या विश्वचषकादरम्यान भारतीय संघाच्या सरावाचा एक फोटोही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये धोनी आणि सचिन तेंडुलकर समान रंगाचे टी-शर्ट घातलेले दिसत आहेत. ही दोन छायाचित्रे व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांचा अंदाज आहे की भारत यावेळी २०११च्या विश्वचषकाची पुनरावृत्ती करू शकतो.

icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनी नोंदवला ऐतिहासिक विजय, भारताला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई संघ
India vs South Africa 2nd T20 Highlights in Marathi
IND vs SA 2nd T20I Highlights : रोमांचक सामन्यात यजमानांनी हिरावला भारताच्या तोंडचा घास, ट्रिस्टन स्टब्सच्या वादळी खेळीने फेरले वरुण चक्रवर्तीच्या मेहनतीवर पाणी
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी
election day fun facts election day activities voting activities on Election Day
मतदान दिनाच्या गमतीजमती!
IND vs SA India National Anthem Witnesses Technical Glitch Ahead Of 1st T20I vs South Africa
IND vs SA सामन्यापूर्वी अचानक काही सेकंदात बंद झाले भारताचे राष्ट्रगीत, मग पुढे काय झालं? जाणून घ्या
IND A vs AUS A India A team Ball Tempering Controversy David Warner Asks Cricket Australia Official Statement
IND vs AUSA: भारताच्या दबावामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बॉल टेम्परिंग प्रकरण गुंडाळलं; डेव्हिड वॉर्नरचं मोठं वक्तव्य

चेन्नईत भारतीय संघाचे सराव सत्र

सराव सत्राबद्दल बोलताना, ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनवर लक्ष केंद्रित केले जाईल, कारण तो फिरकीला अनुकूल अशा चेन्नईच्या खेळपट्टीवर खेळण्याची शक्यता आहे. मात्र, ऑफस्पिनरला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवणे सोपे जाणार नाही, कारण त्याच्या शर्यतीत मोहम्मद शमीही आहे. कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा हे दोन आघाडीचे फिरकी गोलंदाज असल्याने अश्विनला तिसरा फिरकीपटू म्हणून खेळवायचे की नाही हे मुख्य प्रशिक्षक द्रविड आणि रोहित यांनाच ठरवावे लागेल.

पहिल्या लढतीसाठी संघात १० जागा निश्चित झाल्या आहेत. अश्विन आणि शमी यापैकी एकाची निवड करावी लागेल. यंदाच्या आयपीएलमध्ये, चेन्नईच्या खेळपट्टीने फिरकीपटूंना मदत केली, या खेळपट्टीवर तिक्षणा आणि जडेजा यांनी सीएसकेसाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या मनात देखील फिरकीची भीती निर्माण झाली आहे आणि भारतासाठी चांगली गोष्ट आहे.

हेही वाचा: Asian games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय तिरंदाजांचा सुवर्ण लक्ष्यभेद! ज्योती, अदिती आणि प्रनीतची शानदार कामगिरी

दुसरीकडे, वेगवान गोलंदाज एम.ए. चिदंबरमच्या खेळपट्टीवर किती प्रभावी होतील हे येणारा काळच ठरवेल. अशा परिस्थितीत मोहम्मद शमी खूप उपयुक्त ठरू शकतो, कारण तो चेंडू चांगला स्विंग करू शकतो. शिवाय, अनुभवी वेगवान गोलंदाज पॉवर प्ले स्पेशालिस्ट आहे, त्याने गेल्या १५ महिन्यांत पहिल्या १० षटकांमध्ये १५ पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या तिघांपैकी कोणाला संधी मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. भारताचा दुसरा सामना हा अफगाणिस्तान विरुद्ध दिल्ली येथे होणार आहे.