पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक निश्चित झाल्यानंतरही अजून त्याविषयी तक्रारी सुरूच आहेत. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाच्या तयारीची लगबग सुरू असतानाही सामन्यांचे वेळापत्रक बदलण्याच्या चर्चा सुरू आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) तीन पूर्ण सदस्य देशांनी आपल्या सामन्यांचे वेळापत्रक बदलण्याची मागणी केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा यांनीच ही माहिती दिली.

विश्वचषक स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीनंतर जय शहा पत्रकारांशी बोलत होते. ‘‘विश्वचषक स्पर्धा ५ ऑक्टोबरला सुरू होणार आहे. येत्या तीन-चार दिवसांत वेळापत्रकाविषयी अंतिम निर्णय घेतला जाईल,’’ असे शहा म्हणाले.भारत-पाकिस्तान सामना घटस्थापनेच्या दिवशी १५ ऑक्टोबरला अहमदाबाद येथे होणार आहे. या दिवशी सुरू होणाऱ्या नवरात्रीच्या उत्सवाची गुजरातमध्ये मोठी लगबग असते. त्यामुळे पोलिसांनी या सामन्यासाठी पूर्ण क्षमतेने सुरक्षाव्यवस्था पुरविण्यावर असमर्थता दर्शविली. तेव्हापासून सामन्याच्या वेळापत्रक बदलण्याचा विषय ऐरणीवर आला.

‘आयसीसी’चे पूर्ण सदस्य असणाऱ्या तीन-चार देशांनी सामन्यांचे वेळापत्रक बदलण्याची मागणी केली आहे. वेळापत्रक बदलताना सामन्यांच्या तारखा आणि वेळांमध्ये बदल होईल. सामन्यांची केंद्र बदलणार नाहीत. दोन सामन्यांच्या मध्ये सध्या सहा दिवसांचे अंतर आहे. ते चार दिवस कमी केले जाईल. या खेरीज दुसरा बदल होणार नाही. येत्या चार पाच दिवसात याविषयी अंतिम निर्णय घेतला जाईल, असे शहा यांनी सांगितले.