PAK vs NZ Match Updates in Marathi: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या पहिल्याच सामन्यात शतकी खेळी पाहायला मिळाली. पाकिस्तान वि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात न्यूझीलंडचा सलामीवीर विल यंगने आपले शतक पूर्ण केले आहे. विल यंगने एका टोकाला पाय घट्ट रोवून ठेवत संघाची धावसंख्या पुढे नेली. एका टोकाकडून विकेट गमावत असताना विल यंगने महत्त्वपूर्ण शतकी खेळी केली आहे. यंगने १०५ चेंडूंमध्ये १०० धावा पूर्ण केल्या आहे.
पाकिस्तानने कराचीमध्ये खेळवल्या जात असलेल्या पहिल्याच चॅम्पियन्स ट्रॉपी २०२५ च्या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी उतरलेल्या न्यूझीलंडने सावध फलंदाजी करत सुरूवात केली. पण पाकिस्तानच्या गोलंदाजांनी दणक्यात सुरूवात केली. गोलंदाजांनी किवी संघाच्या धावांवर अंकुश ठेवत सलग दोन षटकांत दोन मोठे धक्के दिले.
प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या डेव्हॉन कॉन्वेला १० धावा करत माघारी परतावे लागले. पाकिस्तानचा फिरकीपटू अबरार अहमदने कॉन्वेला क्लीन बोल्ड करत संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला. तर पुढच्याच नवव्या षटकात न्यूझीलंडचा सर्वात अनुभवी फलंदाज केन विल्यमसन तर १ धावा करत झेलबाद होत स्वस्तात बाद झाला. नसीम शाहचा चेंडू विल्यमसनच्या बॅटची कड घेत रिझवानच्या हातात गेला. तर डॅरिल मिचेलदेखील १० धावा करत बाद झाला. तो हॅरिस रौफच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.
एका टोकाला असलेल्या विल यंगने १०० धावाही न गाठता संघाच्या ३ विकेट्स गमावताना पाहिलं. न्यूझीलंडचा संघ चांगलाच तणावात होता, या सलग विकेट्सच्या धक्क्यातून सावरण्यासाठी संघाला चांगल्या खेळीची आणि भागीदारीची गरज होती. विल यंगने जबाबदारी घेत संघाचा डाव उचलून धरला. विल यंगने एका टोकाला उभं राहत १०६ चेंडूंच्या मदतीने ११ चौकार आणि एका षटकारासह आपलं शतक पूर्ण केलं. तर टॉम लॅथमसह १०० अधिक धावांची भागीदारी रचली.
Starting the Champions Trophy in style! Will Young’s fourth ODI century comes from 107 balls with 11 fours and a six. Scores | https://t.co/0pC37HtJtv #ChampionsTrophy #CricketNation ? = ICC/Getty pic.twitter.com/VZBnwbGZAK
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 19, 2025
यासह टॉम लॅथमने देखील विल यंगला चांगली साथ दिली. टॉम लॅथमने चांगली साथ देत आपले महत्वपूर्ण अर्धशतक पूर्ण केले आहे. लॅथमने ५९ चेंडूत ५० धावा करत अर्धशतकी खेळी केली. यासह संघाची धावसंख्या ३६ षटकांत ३ बाद १८३ धावा केल्या आहेत.