न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनची गर्जना
‘‘जामठाची खेळपट्टी फिरकी गोलंदाजासाठी अनुकूल असेल असा आमचा अंदाज आहे आणि त्या दृष्टीने आम्ही तयारी केली आहे. आम्ही आजवर भारताला एकही ट्वेन्टी-२० सामना जिंकू दिलेला नाही, तोच आमचा प्रयत्न या सामन्यातही असेल,’’ असे मत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने व्यक्त केले.
‘‘जेव्हा तुमचा संघ आयसीसी विश्वचषकासारख्या स्पर्धामध्ये खेळतो, तेव्हा त्याची तयारी विविध प्रकारे होत असते. आम्हीदेखील पूर्ण तयारीनिशी भारताचे आव्हान पेलण्यास सज्ज झालो आहोत,’’ असे विल्यमसनने सांगितले.
न्यूझीलंडचा संघाची मार्टिन क्रो यांना श्रद्धांजली
ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंड संघाचे खेळाडू दंडावर काळी फीत बांधून न्यूझीलंडचे माजी कर्णधार मार्टिन क्रो यांना श्रद्धांजली वाहणार आहेत.