निसरडय़ा कोर्टवरील झालेल्या दुखापतींमुळे दिग्गज खेळाडूंची माघार आणि त्यानंतर सेरेना विल्यम्स, मारिया शारापोव्हा, ली ना यांच्यासारख्या बलाढय़ खेळाडूंना बसलेले पराभवाचे धक्के यामुळे विम्बल्डनचा विजेता कोण होणारी याची उत्कंठा अधिकच निर्माण झाली आहे. शनिवारी विम्बल्डन स्पर्धेच्या महिला गटाचा अंतिम फेरीचा मुकाबला फ्रान्सची मारियन बाटरेली आणि जर्मनीची सबिन लिसिकी यांच्यामध्ये होणार आहे. या दोघींनाही पहिल्यावहिल्या ग्रँड स्लॅम जेतेपदाचे वेध लागले आहेत. विम्बल्डनच्या ४५ वर्षांच्या इतिहासात दुसऱ्यांदा एकही ग्रँड स्लॅम न जिंकणाऱ्या दोन खेळाडूंमध्ये अंतिम फेरी रंगणार आहे.
चौथ्या फेरीत सेरेनाला हरवून खळबळ उडवून देणाऱ्या लिसिकीने उपांत्य फेरीत अग्निस्झेका रडवान्स्का हिचे आव्हान परतवून लावत कारकीर्दीत अंतिम फेरी गाठली आहे. याचप्रमाणे ग्रास कोर्टवर सुरेख खेळ करणाऱ्या बाटरेलीने उपांत्य फेरीत कर्स्टन फ्लिपकेन्स हिच्यावर मात करून दुसऱ्यांदा विम्बल्डनच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा