अग्रमानांकित नोवाक जोकोवीच, चौथा मानांकित रॉजर फेडरर यांनी विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत आव्हान राखले.
जोकोवीच याने फ्रान्सच्या गिलेस सिमोन याच्यावर ६-४, ६-२, ६-४ अशी मात केली. फेडरर या माजी विजेत्या खेळाडूने गिलेस म्युलर (लक्झेंबर्ग) याचा ६-३, ७-५, ६-३ असा पराभव केला. रॅफेल नदाल या द्वितीय मानांकित खेळाडूने लुकास  रोसोल याच्यावर ६-४, ७-६ (८-६), ६-४, ६-४ असा संघर्षपूर्ण विजय मिळविला.
केविन अँडरसन याने अपराजित्व राखताना फॅबिओ फोगनानी याच्यावर निसटता विजय मिळविला.
अतिशय रंगतदार झालेली ही लढत त्याने ४-६, ६-४, २-६, ६-२, ६-१ अशी जिंकली. जो विल्फ्रेड त्सोंगा याने जिमी वोंग या चीन तैपेईच्या खेळाडूवर ६-२, ६-२, ६-४ असा सरळ तीन सेट्समध्ये विजय मिळविला.  
तृतीय मानांकित सिमोना हॅलेप हिने लेसिया त्सुरेको (युक्रेन) हिच्यावर ६-३, ४-६, ६-४ अशी मात केली.
अन्य लढतीत कॅरोलीन वोझ्नियाकी हिने क्रोएशियाच्या अ‍ॅना कोंजूम हिचे आव्हान ६-३, ६-० असे संपुष्टात आणले. एकतेरिना माकारोवा हिने कॅरोलीन गार्सिया हिला ६-३, ६-० असे सहज हरविले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा